Manwat Accident | शिवाई बस - मोटारसायकल अपघातात शिक्षक गंभीर जखमी

मानवत–पाथरी–परभणी या महामार्गावर अपघातांची मालिका सुरूच
Parbhani Shivai bus accident
Parbhani Shivai bus accidentPudhari
Published on
Updated on

Parbhani Shivai bus accident

मानवत : मानवत शहरातील संत गजानन महाराज मंदिरासमोरील वळणावर राष्ट्रीय महामार्गावर मंगळवारी (दि. २८) सकाळी सुमारे पावणे आठच्या सुमारास एसटी महामंडळाची शिवाई बस आणि मोटारसायकलचा अपघात होऊन एका शिक्षकाला दुखापत झाली.

भगवान पाथरीकर (वय ५५, रा. पाथरी) असे जखमी शिक्षकाचे नाव असून ते जिंतूर तालुक्यातील झरी येथील जिल्हा परिषद शाळेत कार्यरत आहेत. ते सकाळी शाळेसाठी पाथरीहून मोटारसायकलने (क्र. एमएच २२ एएच ४८५५) निघाले होते. शहराबाहेरील संत गजानन महाराज मंदिरासमोरील वळणावर ते येत असताना परभणीहून मानवतमार्गे नांदेड–बीडकडे जाणारी एसटी बस (क्र. एमएच ४९ बीझेड ७२१९) समोरून येत होती. याच ठिकाणी दोन्ही वाहनांमध्ये धडक झाली.

Parbhani Shivai bus accident
Power outage Manwat | पाथरी वीज उपकेंद्रात स्फोट; मानवतसह अडीच तालुके रात्रभर अंधारात

या अपघातात भगवान पाथरीकर यांच्या हात व पायाला गंभीर दुखापत झाली. रुग्णवाहिका चालक देवा पेडगावकर यांनी त्यांना तातडीने मानवत येथे प्राथमिक उपचारासाठी दाखल केले व नंतर पुढील उपचारासाठी परभणी येथे हलविण्यात आले.

दरम्यान, मानवत–पाथरी–परभणी या महामार्गावर अपघातांची मालिका सुरूच असल्याने नागरिकांमध्ये चिंता व्यक्त होत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news