Parbhani News | सावरगाव सेवा सहकारी सोसायटीवर रयत क्रांती संघटनेचा झेंडा

परिवर्तन शेतकरी विकास पॅनलचा १३ पैकी १० जागांवर दणदणीत विजय; सत्तांतर घडवून आणले
Manwat Seva Sahakari Society Election
रयत क्रांती संघटना प्रणित परिवर्तन शेतकरी विकास पॅनलने १३ पैकी १० जागांवर विजय मिळवत सोसायटीवर आपले वर्चस्व प्रस्थापित केलेPudhari
Published on: 
Updated on: 

Manwat Seva Sahakari Society Election

मानवत : मानवत तालुक्यातील सावरगाव (खुर्द) येथील विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीच्या पंचवार्षिक निवडणुकीत रयत क्रांती संघटना प्रणित परिवर्तन शेतकरी विकास पॅनलने १३ पैकी १० जागांवर विजय मिळवत सोसायटीवर आपले वर्चस्व प्रस्थापित केले. या निकालामुळे सोसायटीत सत्तांतर झाले असून, रयत क्रांती संघटनेचे परभणी जिल्हा उपाध्यक्ष परमेश्वर घाटुळ यांच्या नेतृत्वाला मतदारांनी कौल दिला.

परिवर्तन शेतकरी विकास पॅनलकडून विजयी झालेल्या उमेदवारांमध्ये परमेश्वर दत्तराव घाटुळ (१८८ मते), सखाराम रमाजी टरपले (१६६), माणिक विठ्ठल सौदागर (१६६), सावित्राबाई ज्ञानोबा जाधव (१६३), बाबासाहेब रामप्रसाद सातव (१५७), साहेबराव शेषेराव घाटुळ (१५६), दत्तराव रामभाऊ घाटुळ (१५०), रामभाऊ नारायणराव घाटुळ (१५०), कृष्णा भगवानराव जाधव (१४७) आणि राजाराम सिताराम घाटुळ (१४६) यांचा समावेश आहे.

Manwat Seva Sahakari Society Election
Parbhani news : कमलापुरात वाळलेल्या सोयाबीनची शेतकऱ्याने वैतागून केली होळी

निकालानंतर विजयी उमेदवारांचा सत्कार करण्यात आला. पंचायत समितीचे माजी उपसभापती संतोष आंबेगावकर, माजी सरपंच हनुमान जाधव, माणिक सोनेकर, सुंदर साखरे, सोपान जाधव, राधाकिसन अवचार, जनार्दन अवचार, प्रल्हाद अवचार, धनंजय जाधव, ज्ञानेश्वर जाधव, माणिक घाटुळ, गोविंद जाधव, ज्ञानेश्वर घाटुळ, तुकाराम जाधव आणि बालाजी गव्हाणे यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती.

यावेळी संतोष आंबेगावकर तसेच रयत क्रांती संघटनेचे जिल्हाध्यक्ष मधुकर अवचार यांनी सर्व विजयी उमेदवारांचे आणि मतदारांचे अभिनंदन केले. या विजयामुळे सावरगाव (खुर्द) परिसरात रयत क्रांती संघटनेच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

पुणे शहरातील सर्व अपडेट्स आता WhatsApp वर; आत्ताच जॉईन करा
logo
Pudhari News
pudhari.news