Manwat Crime | मानवत येथे २ लाख हुंड्यासाठी छळ: विवाहितेच्या गालावर चाकूने वार; चार जणांविरुद्ध गुन्हा

हुंड्यासाठी छळ करून महिलेला मारहाण व जीवे मारण्याची धमकी
Harassment Case
Harassment CasePudhari
Published on
Updated on

Manwat Dowry Harassment Case

मानवत : हुंड्यासाठी छळ करून महिलेला मारहाण व जीवे मारण्याची धमकी दिल्याची घटना मानवत शहरात उघडकीस आली आहे. या प्रकरणी चार जणांविरुद्ध मानवत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिला ही आंबेगावगाव नाका परिसरात राहणारी असून, तिचा पती शाहरुख खान जमानत खान पठाण, सासू बीबी जमानत खान पठाण, सासरे जमानत खान पठाण तसेच नणंद निलाफेर आलीम शेख इनामदार यांनी संगनमताने तिचा छळ केल्याची तक्रार दाखल करण्यात आली आहे.

Harassment Case
Parbhani News : बारावीच्या निकालात मुलांपेक्षा मुलीच ठरल्या सरस

दि. ३ मे रोजी रात्री सुमारे १० वाजण्याच्या सुमारास आरोपींनी “माहेरून २ लाख रुपये आण” या कारणावरून महिलेशी वाद घालत शिवीगाळ केली. त्यानंतर पतीने स्वयंपाकघरातील चाकूने तिच्या उजव्या गालावर वार करून जखमी केले. तर इतर आरोपींनीही मारहाण करत तिला घराबाहेर काढण्याची धमकी दिल्याचे तक्रारीत नमूद आहे.

या घटनेप्रकरणी मानवत पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला असून पुढील तपास पोलीस निरीक्षक संदीप बोरकर यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून महिलांवरील अत्याचाराच्या घटनांबाबत संताप व्यक्त केला जात आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news