Parbhani Accident | मानवत बायपास मार्गावरील अपघातातील जखमी वृद्धाचा उपचारादरम्यान मृत्यू

दुचाकीच्या धडकेत खाली पडल्याने डोक्याला गंभीर दुखापत
Manwat Bypass Road Accident
उद्धवराव चिंचानेPudhari
Published on
Updated on

Manwat Bypass Road Accident

मानवत : शहरालगतच्या बायपास मार्गावरील राघवेंद्र जिनिंग परिसरात सोमवारी (दि.२३) सायंकाळी झालेल्या दुचाकी अपघातात डोक्याला गंभीर दुखापत झालेल्या वृद्धाचा परभणी येथे उपचारादरम्यान मध्यरात्री 2 वाजता दुर्देवी मृत्यू झाला. उद्धवराव चिंचाने (वय 60) असे मृत्यूमुखी पडलेल्याचे नाव असून ते येथील कोक्कर कॉलनीमध्ये राहत होते.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, श्रीनिवास आसाराम निर्वळ (वय २२) व विशाल प्रल्हादरराव होंडे (वय २२, दोघेही रा. रुढी) हे एमएच २२ बीएफ ३४६० क्रमांकाच्या मोटारसायकलवरून मानवत येथील आठवडे बाजार आटोपून आपल्या गावाकडे परत जात होते. सोमवारी सायंकाळी सुमारे ७ वाजण्याच्या सुमारास राघवेंद्र जिनिंगजवळ त्यांच्या दुचाकीचा ताबा सुटल्याने अपघात घडला.

Manwat Bypass Road Accident
Parbhani Vet Hospital news | चारठाणा पशुवैद्यकीय दवाखाना 'सलाईन'वर; डॉक्टर, सेवकाअभावी १३ गावांतील पशुधनाची हेळसाड

यावेळी रस्त्याच्या कडेला असलेल्या उद्धवराव चिंचाने (वय ६०) यांना मोटारसायकलचा जोरदार धक्का लागला. धडकेत ते खाली पडल्याने त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. अपघातानंतर स्थानिक नागरिकांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत जखमीला रुग्णवाहिकेद्वारे प्रथम स्थानिक दवाखान्यात हलविले. प्राथमिक उपचारानंतर अधिक उपचारासाठी त्यांना परभणी येथील रुग्णालयात हलविण्यात आले होते. मात्र, त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news