Parbhani Youth Death | मंगरूळ तांडा येथील बेपत्ता तरुणाचा मृतदेह सायखेडा शिवारातील विहिरीत आढळला

बोरी पोलिस ठाण्यात तरुण हरवल्याची तक्रार
Mangrul Tanda youth dead
Mangrul Tanda youth deadPudhari
Published on
Updated on

Parbhani Mangrul Tanda youth dead

चारठाणा : जिंतूर तालुक्यातील मंगरूळ तांडा येथील दीपक हरिभाऊ राठोड (वय 19) हा तरुण चार दिवसांपूर्वी घरातून बाहेर पडला होता. नातेवाईकांनी सर्वत्र शोध घेतला, मात्र त्याचा मागमूस लागला नव्हता. या प्रकरणी बोरी पोलिस ठाण्यात हरवल्याची तक्रार दाखल करण्यात आली होती.

दरम्यान, दिनांक 14 सप्टेंबर रोजी सायंकाळी पाचच्या सुमारास सायखेडा शिवारातील गट क्रमांक 152 मधील शेतातील विहिरीत दीपक राठोड याचा मृतदेह तरंगताना आढळला. नातेवाईकांनी मृतदेह बाहेर काढून जिंतूर येथील शासकीय दवाखान्यात नेले असता डॉक्टरांनी मृत घोषित केले.

Mangrul Tanda youth dead
Parbhani Rain | परभणी जिल्ह्यात मुसळधार पावसाचा कहर : ढगफुटी, अतिवृष्टीमुळे जनजीवन विस्कळीत, पालमला रिमझीम

या प्रकरणी मृताचा भाऊ प्रदीप राठोड यांच्या खबरीनुसार चारठाणा पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून सहाय्यक पोलिस निरीक्षक सुनील अंधारे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक बी. व्ही. झिंजुर्डे तपास करीत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news