

पुर्णा/गंगाखेड/ मानवत : परभणी येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर असलेल्या भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यासमोरच्या भारतीय संविधानाची एका समाजकंटकाने १० डिसेंबर रोजी दुपारी साडेपाच वाजे दरम्यान विटंबना केली. केला याचे तीव्र पडसाद जिल्हाभर उमटले, अनेक शहरात कडकडीत बंद पाळण्यात आला, तर काही ठिकाणी मोर्चा काढण्यात आले. अनेक ठिकाणी मोटरसायकल रॅली काढण्यात आली.
पूर्णा: परभणी येथे जेव्हा घटना घडली त्यावेळी, उपस्थितांनी संशयितास घटनास्थळी पकडून त्यास चोप देवून पोलिसांच्या ताब्यात दिले होते. या घटनेचे पडसाद परभणी बरोबरच पूर्णा शहरातही मंगळवारी सायंकाळी उमटून रात्री डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर डॉ बाबासाहेब आंबेडकरी चळवळीतील नागरिक व भारतीय संविधान प्रेमी जनता जमली त्यानंतर व्यापा-यांनी स्वयंस्फूर्तीने आपली दुकाने तात्काळ बंद केली. घटनेचे गांभीर्य घेत पोलिस प्रशासन देखील सरंक्षणार्थ सज्ज झाले होते. दरम्यान,ता.११ डिसेंबर रोजी पूर्णा शहरातील बौध्द विहारात दुपारी असंख्य संविधानवादी पक्षसंघटना, आंबेडकरवादी जनता एकवटून दुपारी १२:३० वाजे दरम्यान बौद्ध विहार येथून शहरातील मुख्य रस्त्यावरुन डॉ बाबासाहेब आंबेडकर चौक येथ पर्यंत भव्य धिक्कार मोर्चा काढण्यात आला.यावेळी"जबतक सुरज चांद रहेगा डॉ बाबासाहेब आंबेडकर तुम्हारा नाम रहेगा", भारतीय संविधान चिरायू असो अशा घोषणा देण्यात आल्या. यानंतर डॉ बाबासाहेब आंबेडकर पुतळा येथे उपस्थित संविधानवादी पक्षसंघटना व नागरीकांनी संविधान प्रतिकृती विटंबना घटना निषेधार्थ काळ्या फिती लावून जोरदार धिक्कार करण्यात आला. या प्रसंगी,भंतेजी डॉ उपगुप्त महाथेरो, प्रकाशजी कांबळे, दादाराव पंडित, तुषार गायकवाड, विशाल कदम,अनिल खर्गखराटे,उत्तम खंदारे,विरेस कसबे,धम्मा जोंधळे, राजकुमार सुर्यवंशी, हर्षवर्धन गायकवाड, मिनाक्षी पाटील,रऊफ कुरेशी, अब्दुल मुजीब,श्रिकांत हिवाळे, पुंडलिक जोगदंड आदी उपस्थित होते. मागणींचे निवेदन प्रभारी तहसीलदार कैलाशचंद्र वाघमारे, नायब तहसीलदार प्रशांत थारकर यांनी स्विकारले. मोर्चा दरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी उविपोअ डॉ समाधान पाटील,पोनि विलास गोबाडे, महिला सपोनि रेखा शहारे यांनी तगडा बंदोबस्त लावला होता.
या घटनेचे पडसाद गंगाखेड शहरात उमटले नागरिकांनी गंगाखेड बंद पुकारला. शहरातील सर्वत्र बाजारपेठ कडकडीत बंद होती. परभणी येथे झालेल्या प्रकारासंदर्भात गंगाखेड येथील आंबेडकरी आणूयायांनी 10 डिसेंबर रोजी सदर इसमाचा तीव्र शब्दात निषेध करत डॉ बाबासाहेब आंबेडकर चौक येथे मोठा जमाव रात्री 7 दरम्यान जमला होता. यावेळी या जमावाने गंगाखेड पोलीस प्रशासनाला 11 डिसेंबर रोजी गंगाखेड बंद चे निवेदन देण्यात आले. अनुचित प्रकार झालेला नसून शांततेत गंगाखेड बंद पाळण्यात आले पोलीस प्रशासनाने चोख पोलीस बंदोबस्त ठेवला होता.
परभणी येथील घटनेच्या निषेधार्थ शहरातील आंबेडकरी अनुयायी तरुणांनी सकाळपासूनच मोटारसायकल वरून फेरी काढत बाजारपेठ बंद ठेवण्याचे आवाहन केल्याने बाजारपेठ कडकडीत बंद ठेवण्यात आली . तहसीलदार पांडुरंग माचेवाड यांना निवेदन देऊन परभणी घटनेचा तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला असून आरोपीवर कडक कारवाई करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे . परभणी घटनेच्या निषेधार्थ येथील सकल हिंदू समाजाच्या वतीने पोलीस व तहसील प्रशासनास निषेधाचे निवेदन देत आरोपीवर कडक कारवाई करण्याची मागणी करण्यात आली .
ताडकळस : परभणी शहरातील या दुर्दैवी घटनेचा निषेर्धात आज बुधवार रोजी आंबेडकरी अनुयांनी देण्यात आलेल्या बंदची हाकेस ताडकळस येथील व्यापाऱ्यानी बाजारपेठ पूर्णपणे बंद ठेवण्यात आली होती सकाळ पासून शहरातील सर्वच दुकाने हाॕटेल सह इतर दुकाने कडकडीत बंद होती. ताडकळस शहरातील आंबेडकरी अनुयायांनी शहरातील डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौक येथे एकत्र येतं त्या घटनेचा निषेध व्यक्त केला ताडकळस शहर बंदची हाक दिली. सहायक पोलीस निरीक्षक गजानन मोरे यांना डॉ.आंबेडकर चौकात निवेदन दिले होते. बससेवा बंद होती खाजगी प्रवासी वाहने अॕटो पूर्णपणे बंद होती. शहरातील तणावग्रस्त परिस्थिती लक्षात घेता पोलीस उपनिरीक्षक शिवकात नागरगोजे,गजानन काठेवाडे,व पोलीस कर्मचारी यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.