

चारठाणा : स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने बुधवारी (दि.6) सायंकाळी 5 वाजता जिंतूर तालुक्यातील चारठाणा पोलिस ठाण्याच्या हद्दीत कारवाई करून सुमारे चार लाख तेरा हजाराचा अवैध दारूसाठा जप्त केला आहे.
पोलीस अधीक्षक रविंद्रसिंह परदेशी यांनी स्था.गु.शा.च्या पथकास अवैध धंद्यांवर कारवाई करण्याचे आदेश दिले होतें त्यानुसार स्था.गु.शा. पथकाने गोपनिय माहिती काढून चारठाणा पोलिस ठाण्याच्या हद्दीत रायखेडा (ता. जिंतूर) येथे आरोपीने त्याच्या शेतात अवैध दारूचा साठा लपवून ठेवलेल्या ठिकाणी सापळा रचून व छापा मारला.
यावेळी आरोपी राजू तुकाराम जाधव (वय 38 वर्षे, रा. रायखेडा, ता.जिंतूर) याने शेतातील घरासमोरील पत्र्याच्या शेडमध्ये व सोयाबीनचे भुशामध्ये 4 लाख 13 हजार 280 रुपयांचा अवैध दारू साठा लपवून ठेवलेला मिळून आला. हा साठा जप्त करून आरोपी विरूध्द चारठाणा येथे पोलिस ठाण्यात कलम 65 (e) म.दा.का. प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या कारवाईत एकूण 4 लाख 13 हजार 280 रुपयांचा अवैध दारूसाठ्याचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. तसेच आरोपी राजू तुकाराम जाधव (वय 38 वर्षे, रा.रायखेडा, ता.जिंतूर) याने विनापरवाना बेकायदेशिररित्या चोरटी विक्री करण्याच्या उद्देशाने ठेवल्यावरून त्याला पुढील कारवाईसाठी चारठाणा पोलिस ठाण्यात हजर केले आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक रवींद्रसिंह परदेशी यांचे मार्गदर्शनाखाली व अपर पोलीस अधीक्षक यशवंत काळे व सहाय्यक पोलीस अधीक्षक जिवन बेनीवाल यांच्या नेतृत्वात स्था.गु.शा.चे पोलिस निरीक्षक अशोक घोरबांड, चारठाणा येथील स.पो.नि. सुनिल अंधारे, पोउपनि गोपीनाथ वाघमारे, अजित बिरादार, पोलीस अंमलदार विलास सातपुते, सिध्देश्वर चाटे, विष्णू चव्हाण, राम पौळ, नामदेव दुबे, मधुकर ढवळे, संजय घुगे यांनी मिळून केली.