Parbhani Accident | नांदेड–पूर्णा महामार्गावर भरधाव दुचाकीची ऑटोला धडक; चौघे जखमी

पूर्णा तालुक्यातील नांदेड–पूर्णा महामार्गावरील गौर गावाजवळ
Nanded Purna Road Bike Auto Collision
Nanded Purna Road Bike Auto Collision Pudhari
Published on
Updated on

Nanded Purna Road Bike Auto Collision

पूर्णा : पूर्णा तालुक्यातील नांदेड–पूर्णा महामार्गावरील गौर गावाजवळ शुक्रवारी (दि. ३) दुपारी सुमारे १ वाजण्याच्या सुमारास भरधाव दुचाकीने प्रवासी ऑटोला पाठीमागून जोरदार धडक दिल्याने झालेल्या अपघातात चौघेजण जखमी झाले.

मिळालेल्या माहितीनुसार, एमएच २२ एपी ४०८८ क्रमांकाचा प्रवासी ऑटो गौर येथून प्रवासी घेऊन पूर्णाकडे जात होता. याचवेळी पाठीमागून भरधाव वेगाने येणाऱ्या एमएच २२ बीजे ९७३२ क्रमांकाच्या पल्सर दुचाकीने ऑटोला जोरदार धडक दिली. धडकेचा जोर इतका होता की, ऑटोचा ताबा सुटून तो रस्त्याच्या मध्यभागी उलटला.

Nanded Purna Road Bike Auto Collision
Parbhani deer accident | अज्ञात वाहनाच्या धडकेत काळवीट जखमी, वन विभागाची उदासीनता!

या अपघातात ऑटोमधील एक महिला व एक पुरुष गंभीर जखमी झाले, तर अन्य दोघांना हात व नाकाला दुखापत झाली. अपघाताची माहिती मिळताच चुडावा पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक चव्हाण व पोलीस कॉन्स्टेबल महाजन यांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली.

जखमींना तातडीने पूर्णा येथील खासगी रुग्णालयात प्राथमिक उपचार देऊन पुढील उपचारासाठी नांदेड येथे हलविण्यात आले. दरम्यान, अपघातातील दुचाकीस्वारावर पूर्णा ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

Nanded Purna Road Bike Auto Collision
Parbhani Accident | मानवत-परभणी महामार्गावर आयशर - कारची धडक: दोन तरुणांचा जागीच मृत्यू

या प्रकरणी चुडावा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून, जखमी सर्वजण गौर येथील रहिवासी असल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news