विजेच्या धक्क्याने मृत्यू झालेल्या 'त्या' तरुणाचे तब्बल २० तासानंतर शवविच्छेदन

Parbhani News | गौर येथील विशाल जोगदंडला विद्युत खांबावर विजेचा धक्का
Gaur village incident
गौर येथील विशाल जोगदंडच्या मृतदेहाचे तब्बल २० तासानंतर शवविच्छेदन करण्यात आले. Pudhari Photo
Published on
Updated on
आनंद ढोणे

पूर्णा: गौर येथील विशाल सुदाम जोगदंड (वय २२ ) पूर्णा उपविभाग विद्युत महावितरण अंतर्गतच्या कंत्राटदाराकडे आऊटसोर्सिंग रोजंदारीवर कामावर होता. त्याचा विद्युत खांबावर काम करताना शॉक लागून रविवारी सायंकाळी मृत्यू झाला होता. त्यानंतर गौर येथील नागरिकांचा जथ्था घटनास्थळी दाखल होत मृत विशाल जोगदंड यांच्या घरच्या नातेवाईकासह जमलेल्या ग्रुपने खांबावर चढवणारे महावितरणचे कर्मचारी, अधिकारी व अन्य दोषींवर कारवाई करण्याच्या मागणीसाठी मृतदेह खांबावरुन खाली उतरवू न देता ठिय्या मांडला होता.

पोलीस अधिकारी व गावातील काही जाणकारांच्या मध्यस्थीनंतर रात्री उशिरा विद्युत खांबावरील तारेवर लटकलेला मृतदेह खाली उतरवून घेण्यात आला. त्यानंतर शासकीय रुग्णालयात मृतदेह शवविच्छेदनासाठी नेण्यात आला. तरी आक्रमक झालेल्या नागरिकांनी शवविच्छेदन होऊ दिले नाही. त्यांनी आपली मागणी रेटून लावत अख्खी रात्रं जागून काढली. त्यानंतर आज (दि. २०) सकाळी उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ. समाधान पाटील, पोलीस निरीक्षक विलास गोबाडे यांनी नागरिकांची समजूत घातली. शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख विशाल कदम, अमृतराज कदम, मराठा नेते साहेबराव कल्याणकर, पूर्णा साखर कारखान्याचे संचालक श्रीधर पारवे, शरद जोगदंड, नरेश जोगदंड आदींनी मध्यस्थी केली. त्यानंतर दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास म्हणजे तब्बल २० तासानंतर मृत विशाल जोगदंड यांच्या पार्थिवाचे शवविच्छेदन करण्यात आले.

दरम्यान, सहायक पोलीस निरीक्षक गजानन मोरे, नरसिंग पोमनाळकर, उपनिरीक्षक पडळकर यांनी ग्रामीण रुग्णालय, महावितरण कार्यालयासमोर मोठा पोलिस बंदोबस्त ठेवला होता. पोलिसांची दंगल नियंत्रण कुमकही बोलावण्यात आली होती. त्यानंतर शोकाकुल वातावरणात गौर येथे विशाल जोगदंड यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

Gaur village incident
परभणी : विद्युत खांबावर दुरूस्तीचे काम करताना विजेचा झटका लागून मजुराचा मृत्यू

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news