

Parbhani Farm Labour Union Protest
मानवत: तालुक्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या शेतातील उभ्या पिकांसह जनावरांचे मोठे नुकसान झाले आहे. यामुळे शेतमजुरांच्या हातचे कामे गेल्याने सरकारने शेतमजुरांना जीवन जगण्यासाठी आर्थिक मदत द्यावी व ओला दुष्काळ जाहीर करावा यासह अन्य मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य शेतमजूर युनियन शाखा, किसान सभा व सिटुच्या वतीने आज (दि.10) तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले.
यावेळी आंदोलनकर्त्यांनी तहसीलदार पांडुरंग माचेवार यांना निवेदन दिले. राज्यात ओला दुष्काळ जाहीर करावा, शेतमजुरांना श्रम नुकसान भरपाई म्हणून तीस हजार रुपये द्यावे, रोजगार हमीचे कामे तात्काळ करावी, विद्यार्थ्यांची फी माफ करावी, शेतमजुरांना ओळखपत्र द्यावे, अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना हेक्टरी 50 हजाराची मदत द्यावी, संपूर्ण कर्जमाफी करावी, नवीन पीक कर्ज द्यावे, अशी मागणी निवेदनात करण्यात आली.
आंदोलनात माकपचे तालुका सरचिटणीस रामराजे महाडिक, अशोक बुरखुंडे, लिंबाजी धनले, इंदुमती महाडिक, शिवसेना शहरप्रमुख अनिल जाधव, नंदु पाटील, कुंडलिक थिटे, रुक्मिणीबाई शिदे, दादासाहेब देशमुख, जनार्दन देशमुख, उद्धव निर्वळ, नंदु लांडगे, महादेव तुपामुद्रे, सुदाम भिसे, नारायण टगुळे, भिमराव पांचाळ, पंडित बुरखुडे, एकनाथ देशमुख, सुशीला काळे, उषा काळे, संगिता रेंगे, रुक्मिणी धनुरे, आश्रोबा घागरे, अरुणा मगर, सोपान दहे, संतोष मगर व अनेक शेतकरी व शेतमजूर उपस्थित होते.