कट मारल्याच्या किरकोळ कारणावरून युवकावर हल्ला

Parbhani crime | वीट व काठीने मारहाण, जीवे मारण्याची धमकी
Crime News
Crime Newsfile photo
Published on
Updated on

मानवत : मोटारसायकलला कारने कट मारल्याच्या किरकोळ कारणावरून युवक व त्याच्या काकावर वीट आणि काठीने हल्ला केल्याची धक्कादायक घटना मानवत शहरातील रचना कॉलनी परिसरात घडली. या प्रकरणी मानवत पोलीस ठाण्यात दोघांविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी शेख मो.आहाद शेख मो अनिस ( रा. राज गल्ली, मानवत) हे आपल्या काका माहेमद जावेद माहेमद इसाक शेख यांच्यासह १९ एप्रिल रोजी सायंकाळी सुमारे ६.२५ वाजता मोटारसायकलने शेताकडे जात होते. त्यावेळी रचना कॉलनी परिसरात पांढऱ्या रंगाच्या कार (एमएच ०६ सीबी ९९९१ ) चालकाने त्यांच्या मोटारसायकलला कट मारला. त्यामुळे दोघेही रस्त्यावर पडले. यानंतर वाहन नीट चालवण्याबाबत जाब विचारल्याचा राग मनात धरून कार चालक आकाश राठोड हा खाली उतरला. त्याने शिवीगाळ करत गाडीचा दरवाजा उघडून जमिनीवरील वीट उचलून फिर्यादीच्या काकाच्या डोक्यात मारली. त्यात ते जखमी झाले असून रक्तस्राव झाला. तसेच आरोपीच्या साथीदाराने काठीने मारहाण केल्याचे फिर्यादीत नमूद आहे.

हल्ल्यानंतर आरोपींनी “जीवे मारून टाकतो” अशी धमकी दिल्याचेही तक्रारीत म्हटले आहे. जखमींना तत्काळ उपचारासाठी दवाखान्यात हलविण्यात आले. या घटनेप्रकरणी मानवत पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आला असून भारतीय न्याय संहिता कलम ११८ (१),३(५),३५१(१),३५२ अन्वये कारवाई करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक संदीप बोरकर यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news