Parbhani crime | बनावट रॉयल्टी दाखवून रेतीची तस्करी करणाऱ्या टिप्परवर पोलिसांची 'धडाकेबाज' कारवाई

या कारवाईमुळे अवैध रेती वाहतूकदारांचे धाबे दणाणले आहेत
Parbhani crime | बनावट रॉयल्टी दाखवून रेतीची तस्करी करणाऱ्या टिप्परवर पोलिसांची 'धडाकेबाज' कारवाई
Published on
Updated on

चारठाणा : जिंतूर तालुक्यातील अवैध रेती उपसा आणि वाहतुकीविरोधात उपविभागीय पोलीस अधिकारी आणि चारठाणा पोलिसांनी संयुक्त मोहीम राबवत एका रेती माफियाच्या मुसक्या आवळल्या आहेत. जोगवाडा परिसरात सापळा रचून ५ लाख २० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, या कारवाईमुळे अवैध रेती वाहतूकदारांचे धाबे दणाणले आहेत.

जोगवाडा (ता. जिंतूर) येथून रेतीचा टिप्पर बेकायदेशीरपणे जात असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार सहाय्यक पोलीस निरीक्षक मुंजाजी दळवे यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने २९ मार्च रोजी दुपारी २:३० च्या सुमारास जोगवाडा-वरुड रोडवर नारायण वाकळे यांच्या घरासमोर टिप्पर (क्र. MH 22 AN 4107) अडवला.

असा उघड झाला बनावटगिरीचा डाव

टिप्पर चालक नानासाहेब सुभाष सारूख (रा. केमापूर, ता. सेलू) याने पोलिसांना दिग्रस बुजरूक येथील रॉयल्टी पावती दाखवली. मात्र, पोलिसांनी बारकाईने तपासणी केली असता, रॉयल्टी पावतीवर गाडीच्या क्रमांकात खाडाखोड केल्याचे आढळून आले. आरोपी एका धक्क्यावरून रेती भरून दुसऱ्या धक्क्याची जुनी पावती दाखवून प्रशासनाची दिशाभूल करत असल्याचे निष्पन्न झाले.

५ लाखांचा मुद्देमाल जप्त

या कारवाईत पोलिसांनी ४ ब्रास रेती: किंमत २० हजार रुपये, टिप्पर: किंमत ५ लाख रुपये अशा एकूण किंमत: ५ लाख २० हजार रुपयांंचा मुद्देमाल जप्त केला आहे।

गुन्हा दाखल अन् कडक इशारा

पोलीस हवालदार सुनील कोंडीबा गोरे यांच्या फिर्यादीवरून आरोपीवर चारठाणा पोलीस ठाण्यात बी.एन.एस. (BNS) कलम ३०३(२) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या मोहिमेत स.पो.नि. पुंड, सुनील गोरे, दत्ता गुगाणे, श्रीकृष्ण तंबूर आणि बीट जमादार कालवाणे यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.

"अवैध रेती वाहतूक करणाऱ्यांना क्षेत्रात अजिबात थारा दिला जाणार नाही. गेल्या तीन दिवसांतील ही दुसरी मोठी कारवाई असून, यापुढेही कडक मोहीम सुरूच राहील."

— मुंजाजी दळवे, सहाय्यक पोलीस निरीक्षक, चारठाणा

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news