Parbhani Crime : स्थागुशाकडून घरफोडी, चोरीच्या ९ गुन्ह्यांची उकल

६ लाख १० हजार ८२६ रुपयांचा मुद्देमाल हस्तगत; विधी संघर्षग्रस्त बालकासह आई ताब्यात
Parbhani Crime News
Parbhani Crime Branchpudhari photo
Published on: 
Updated on: 

परभणी : परभणी स्थानिक गुन्हे शाखेने जिल्ह्यातील नवामर्मोढा, पालम, ताडकळस, जिंतूर, चारठाणा, सेलू, दैठणा आणि चंदनझिरा (जालना) पोलीस ठाणे आदी पोलीस ठाण्यांच्या हद्दीत झालेल्या घरफोडी व चोरीच्या ९ गुन्ह्यांची उकल केली असून, या गुन्ह्यांतील सोने व नगदी असा एकूण ६ लाख १० हजार ८२६ रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला. या प्रकरणात एका विधीसंघर्षग्रस्त बालकासह त्याची आई लक्ष्मीबाई भोसले यांना ताब्यात घेऊन मुद्देमालासह नवामोंढा पोलीस ठाण्यात पुढील कायदेशीर कारवाईसाठी हजर करण्यात आले आहे. या प्रकरणातील पुढील तपास सुरू आहे.

परभणी जिल्ह्यातील घरफोडीच्या गुन्ह्यांतील आरोपींचा शोध घेऊन गुन्हे उघड करण्याच्या अनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखेकडून तपास सुरू होता. पोलीस अधीक्षक पंकज कुमावत यांच्या आदेशाने, अपर पोलीस अधीक्षक चिखले व पोलीस निरीक्षक गजेंद्र सरोदे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थागुशाचे पथक जिल्ह्यातील घरफोडीच्या गुन्ह्यांची माहिती घेत होते.

Parbhani Crime News
Hingoli Water Crisis : हिंगोलीकरांनो, पाणी जपून वापरा

दरम्यान, स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला गोपनीय बातमीदारामार्फत खात्रीशीर माहिती मिळाली की, एका विधीसंघर्षग्रस्त बालकाने त्याच्या अन्य तीन साथीदारांसह परभणी जिल्ह्यातील विविध ठिकाणी घरफोड्या केल्या आहेत. या माहितीच्या आधारे पथकाने दर्गा रोड परिसरात संबंधित बालकाचा शोध घेतला.

यावेळी जामकर विद्यालयाच्या पाठीमागील मैदानात पाल टाकलेल्या ठिकाणी सदर विधीसंघर्षग्रस्त बालक व त्याची आई लक्ष्मीबाई भोसले हे दोघे मिळून आले. पोलिसांनी बालकाला विश्वासात घेऊन जिल्ह्यातील घरफोडीच्या गुन्ह्यांबाबत विचारपूस केली. त्यावेळी त्याने अन्य ३ साथीदारांसह विविध ठिकाणी घरफोड्या केल्याची माहिती दिली. तपासादरम्यान संबंधित गुन्ह्यांतील मुद्देमालाबाबत बालक व त्याच्या आईकडे विचारणा करण्यात आली. त्यावेळी बालकाच्या हिश्श्याला आलेला गुन्ह्यातील मुद्देमाल त्याची आई लक्ष्मीबाई भोसले हिने पालातून २ पंचांसमक्ष काढून पोलिसांच्या ताब्यात दिला.

Parbhani Crime News
Nanded Women Farmers Registration : महिला शेतकरी नोंदणीत किनवट जिल्ह्यात अव्वल

त्यानंतर विधीसंघर्षग्रस्त बालक व त्याची आई लक्ष्मीबाई भोसले यांना गुन्ह्यातील मुद्देमालासह पुढील कायदेशीर कारवाईसाठी नवामोंढा पोलीस ठाण्यात हजर करण्यात आले. स्थागु शाखेने उघड केलेल्या गुन्ह्यांमध्ये जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यांच्या हद्दीतील ८ गुन्हे व जालना जिल्ह्यातील चंदनझिरा पोलीस ठाण्यातील एका गुन्ह्याचा समावेश आहे.

ही कामगिरी पोलीस अधीक्षक पंकज कुमावत यांच्या आदेशाने, अपर पोलीस अधीक्षक चिखले व पोलीस निरीक्षक गजेंद्र सरोदे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने केली. या पथकामध्ये पोलीस उपनिरीक्षक चंदनसिंह परिहार, पीएसआय मधुकर चट्टे, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक सुग्रीव केंद्रे, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक निलेश भुजबळ, पोहेकॉ. नेताजी गीते, पोहेकॉ. केशव लटपटे, पोहेकॉ. लक्ष्मण कांगणे, पोहेकॉ. मुकेश बुधवंत, पोहेकॉ. पांडुरंग तुपसुंदर, पोहेकॉ. सुनील राठोड, पोहेकॉ. उमेश चव्हाण व पोकों विलास बहुरे यांचा समावेश आहे.

वरील नऊ गुन्ह्यांमध्ये एकूण ६ लाख १० हजार ८२६ रुपये किमतीचा सोने व नगदी असा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. संबंधित विधीसंघर्षग्रस्त बालक व त्याची आई लक्ष्मीबाई भोसले यांना गुन्ह्यातील मुद्देमालासह नवामोंढा पोलीस ठाण्यात हजर करण्यात आले असून, या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.