परभणी: लक्ष्मीनगर येथील वाळू डेपो बंद करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश‌

परभणी: लक्ष्मीनगर येथील वाळू डेपो बंद करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश‌
Published on
Updated on


पूर्णा: तालुक्यातील लक्ष्मीनगर येथील वादग्रस्त ठरलेला गाळमिश्रीत वाळू डेपो, वाळू घाट उत्खनन व विक्री तत्काळ बंद करण्याचे आदेश जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांनी उपविभागीय अधिकारी गंगाखेड, पूर्णा तहसिलदार यांना दिले आहेत. यामुळे संबंधित वाळूघाट लिलाव धारकांत एकच खळबळ उडाली आहे.

लक्ष्मीनगर-पिंपळगाव बाळापूर येथील रेती घाटातून वाळू उपसा करताना महसूल व वनविभागाने ठरवून दिलेल्या अटी -शर्ती नियमांचे पालन केले जात नव्हते. शासकीय वाळू विक्री डेपोत नियमानुसार रेती साठवणूक केली जात नव्हती. तसेच ठरलेल्या गटाऐवजी पिंपळगाव शिवार गटातील १३३, ३४ गटातील नदीपात्रातून थेट बेकायदेशीरपणे रेतीचे उत्खनन करुन चढ्या दराने विक्री केली जात होती. त्याचबरोबर रेती भरण्याच्या कारणावरुन एकमेकांत हमरीतुमरी, पिस्तुलचा धाक दाखविणे, असे प्रकार घडत होते.

ठरवून दिलेल्या ठिकाणी सीसीटीव्ही न बसवणे, जीपीएस यंत्रणा न लावणे, दर पंधरा दिवसाला सीसीटीव्हीचे फुटेज सादर न करणे, वजनकाटे न बसवणे, वाळू गटाच्या ठिकाणी फलक न लावणे, गाळमिश्रीत वाळूचा दैनंदिन हिशोब जिल्हा खनिकर्म व महसुल अधिकारी यांना सादर न करणे, वाळू डेपोशी व संलग्न वाळू घाटाशी संबंधित लोकप्रतिनिधी, ग्रामस्थ, विविध सामाजिक कार्यकर्ते, संस्थांकडून अवैध वाळू उत्खनन व वाहतुकीबाबतच्या असंख्य तक्रारी जिल्हाधिकारी कार्यालयाकडे करण्यात आल्या होत्या.

या तक्रारांची दखल घेत २७ फेब्रुवारीपासून पुढील आदेश येईपर्यंत वाळू डेपो व वाळूघाट उत्खनन व विक्री तत्काळ बंद करण्याचे आदेश जिल्हाधिकारी यांनी दिले आहेत. तर वाळूचे प्रमाण निश्चित करण्यासाठी जिल्हा वाळू सनियंत्रण समितीची बैठक १ मार्च २०२४ रोजी‌ जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित करण्यात आली आहे.

हेही वाचा 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news