Parbhani News : चिमुकलीवर अत्याचारप्रश्नी मानवत कडकडीत बंद

नाशिक जिल्ह्यामधील मालेगाव तालुक्यातील डोंगराळे येथील ४ वर्षीय चिमुकलीवर बलात्कार करून तिची निघृण हत्या झाल्याच्या अमानुष घटनेने राज्याला हादरवून टाकले.
Parbhani News
Parbhani News : चिमुकलीवर अत्याचारप्रश्नी मानवत कडकडीत बंदFile Photo
Published on
Updated on

Parbhani Child abuse issue manvat city closed

मानवत, पुढारी वृत्तसेवा नाशिक जिल्ह्यामधील मालेगाव तालुक्यातील डोंगराळे येथील ४ वर्षीय चिमुकलीवर बलात्कार करून तिची निघृण हत्या झाल्याच्या अमानुष घटनेने राज्याला हादरवून टाकले. या घटनेचा मानवतमध्ये शनिवारी (दि.२२) निषेध व्यक्त करत कडकडीत बंद पाळला. जनसमुदायाच्या सहभागातून तहसील कार्यालयावर जनआक्रोश मोर्चा काढून आरोपीस फाशीची शिक्षा देण्याची मागणी करण्यात आली.

Parbhani News
Malgaon Rape Case | चिमुकलीवरील अत्याचाराच्या विरोधात मानवत शहरात कडकडीत बंद

सराफा, सुवर्णकार संघटनेने दिलेल्या आवाहनाला व्यापाऱ्यांनी प्रतिसाद देत शहरातील किराणा, ज्वेलर्स, कपड्यांची दुकाने, बाजारपेठा, खाद्यपदार्थ विक्रेते तसेच लहान-मोठी प्रतिष्ठाने बंद ठेवली. बंद दरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून स्वयंसेवकांनी शिस्तबध्द पध्दतीने रस्त्यांवर कार्यरत राहून जन-तेला मार्गदर्शन केले.

Parbhani News
Parbhani Youth Death | वणीसंग येथे खळबळ; तरुणाने गळफास घेऊन जीवन संपविले

शहरातील मुख्य बाजारपेठ, गांधी चौक आणि पालिकेचा परिसर सकाळपासूनच ओस पडला होता. पालिका कार्यालयासमोरून मोर्चाला सुरुवात झाली. हातात फलक, बॅनर व काळे रिबन लावून नागरिकांनी शहरातील मुख्य मागनि शांततेत पण तीव्र भावना व्यक्त करत मोर्चा काढला. चिमुकलीला न्याय मिळाला पाहिजे, आरोपीला तत्काळ फाशी द्या, न्याय मिळेपर्यंत लढा सुरू राहील अशा घो-षणांनी शहराचे वातावरण संतापाने भरून गेले. महिला व युवकांचा मोर्चातील सहभाग लक्षवेधी ठरला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news