

चारठाणा : जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सुप्रीम कोर्टाने 31 जानेवारीपर्यंत सर्व निवडणुका घेण्याचे आदेश दिले. यानंतर ग्रामीण भागातील मंदावलेल्या राजकीय हालचालींना पुन्हा एकदा गती प्राप्त झाली आहे.
चारठाणा गट व गणात उमेदवारीसाठी पक्षांतर्गत स्पर्धा लागल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे. चारठाणा गट सर्वसाधारण प्रवर्ग महिलासाठी सुटल्याने या गटात मोठी चुरस वाढली आहे. चारठाणा गन सर्वसाधारण प्रवर्ग साठी सुटले आहे. त्यामुळे गण व गटात इच्छुक असलेले उमेदवार गावोगावी भेटी देत आहेत. चारठाणा गटातील गावांमध्ये भेटी गाठी चालू झाल्याचे चित्र सध्या ग्रामीण भागात पहावयास मिळत आहे. भाजपचे निष्ठावंत कार्यकर्ते इंद्रजीत घाटूळ यांनी आपल्या सौभाग्यवती सोनाली घाटूळ यांच्यासाठी गावोगावी भेटीगाठी चालू केले आहेत. त्यातच त्यांनी आगामी जिल्हा परिषदेच्या निवडणुकीसंदर्भात चारठाणा सर्कलमधली मोळा येथील ग्रामस्थाची भेट घेतली असता, ग्रामस्थांनी आपण जिल्हा परिषद निवडणुकीत उभे राहावे अशी नागरिक स्वतःहून बोलावून दाखवीत आहेत.
गावोगावी भाजपाचे निष्ठावंत कार्यकर्ते इंद्रजीत घाटूळ यांना वाढता पाठिंबा मिळत आहे. निष्ठावंत विरुद्ध नव्याने पक्षात आलेले कार्यकर्ते सध्या पक्षाकडून कोणालाच उमेदवारी जाहीर झाली नसली तरी काहीजण मलाच उमेदवारी मिळेल, अशा मानसिकतेत दिसत आहे. तीन दशकापासून पक्षाशी निष्ठा जपणाऱ्यांना दुर्लक्षित करून फक्त खर्चाच्या गणितावर नवीन पक्षात प्रवेश करणाऱ्यांना जर उमेदवारी दिली तर दुखावलेले निष्ठावंत कार्यकर्ते त्यांना निवडून आणतील की नाही हाही विचार नेतृत्वाला करावा लागेल. आगामी जिल्हा परिषद निवडणुकीसाठी भाजपाचे निष्ठावंत कार्यकर्ते इंद्रजीत घाटूळ हे आपल्या सौभाग्यवती सोनाली घाटूळ यांच्यासाठी जिल्हा परिषद गटातील गावोगावी भेटीगाठी घेऊन त्या त्या गावातील ग्रामस्थांची चर्चा करीत आहे.