Illegal Sand Transport Parbhani |अवैध रेती वाहतूक करणारा ट्रॅक्टर पोलिसांच्या ताब्यात; दोघांविरुद्ध गुन्हा

देवगाव परिसरात केलेल्या कारवाईत ट्रॅक्टर, ट्रॉली आणि रेतीसह ६ लाखांचा मुद्देमाल जप्त
Charthana Illegal Sand Transport
Charthana Illegal Sand TransportPudhari
Published on
Updated on

Charthana Illegal Sand Transport

चारठाणा : विना परवाना अवैधरीत्या रेतीची वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरवर चारठाणा पोलिसांनी कारवाई केली. देवगाव परिसरात केलेल्या या कारवाईत ट्रॅक्टर, ट्रॉली आणि रेती असा एकूण ६ लाख १० हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. याप्रकरणी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

चारठाणा पोलिसांना देवगाव परिसरातून अवैध पद्धतीने रेतीची वाहतूक होत असल्याची माहिती मिळाली होती. या माहितीच्या आधारे सहाय्यक पोलीस निरीक्षक बालाजी पुंड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी देवगावजवळ सापळा रचला. यावेळी एमएच २२ डब्ल्यू १८९७ क्रमांकाचा ट्रॅक्टर पोलिसांच्या निदर्शनास आला. ट्रॅक्टरला लाल रंगाची विना पासिंगची ट्रॉली जोडलेली होती. या ट्रॉलीमध्ये सुमारे दीड ब्रास रेती आढळून आली. या रेतीची किंमत १० हजार ५०० रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले.

Charthana Illegal Sand Transport
Parbhani Crime: तत्कालीन सोनपेठ तहसीलदाराच्या अपसंपदेचा पर्दाफाश

पोलिसांनी ट्रॅक्टर हेड, ट्रॉली आणि रेती असा एकूण ६ लाख १० हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणी पोलीस शिपाई दत्ता कुंडलिकराव चव्हाण यांच्या फिर्यादीवरून शंकर भगवान केरळकर (वय २१, रा. निरवाडी, ता. सेलू) आणि एकनाथ मधुकर गरड (रा. देवगाव फाटा, ता. सेलू) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक बालाजी पुंड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार थोरे करीत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news