

चारठाणा: जिंतूर तालुक्यातील चारठाणा हे सर्वात मोठे गाव आहे. चारठाणा हे गाव स्वातंत्र्य सैनिकांचे गाव म्हणून ओळखले जाते. परंतु या गावाला आधार केंद्र नाही हे शोकांतिका आहे. या गावच्या परिसरात 44 खेडी जोडलेली असून, या गावाशी शेजारील गावातील लोकांचा नेहमी संपर्क आहे.
आधार लिंक आधार अपडेट जर करायचा असेल, तर रायपूर वाघी देवगाव फाटा किंवा जिंतूर गाठावे लागत असल्याने ग्रामस्थांमध्ये नाराजीचा सूर आहे. एवढ्या मोठ्या गावात आधार केंद्र नाही ही मोठी शोकांतिका आहे. प्रशासन अनेक सुविधा देत आहे ही सुविधा का देत नाही? असा प्रश्न ग्रामस्थांना नेहमीच भेडसावत आहे.
चारठाणा येथे आधार केंद्र असणे नित्यांत गरजेचे आहे. परंतु या बाबीकडे लोकप्रतिनिधी कार्यकर्ते जाणून बुजून का दुर्लक्ष करीत आहेत? हे मात्र एक कोडेच आहे. चारठाणा येथे विविध पक्षाचे कार्यकर्ते आहेत. परंतु हे कार्यकर्ते नसल्यासारखे आहेत. विशेष म्हणजे नूतन जिल्हाधिकारी संजय चव्हाण यांनी या बाबीकडे तात्काळ लक्ष घालून चारठाणा येथे आधार केंद्र कार्यान्वित करावे अशी मागणी ग्रामस्थांमधून होत आहे.