परभणी : अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार जागीच ठार

Road accident: कंटेनर चौकशीसाठी ताब्यात
Road accident
घटनास्थळी दाखल पोलीस व दुस-्या छायाचित्रात दुचाकी.pudhari photo
Published on
Updated on

चारठाणा : चारठाणा येथून मंठा येथे दुचाकीने जात असताना अज्ञात वाहनाने दुचाकीस धडक दिल्याने दुचाकीस्वार जागीच ठार झाल्याची घटना शनिवार दि. ८ सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास घडली. अनिल गणेश सोनवणे (वय ३५) हा तरुण चारठाणा येथून मंठा येथे पल्सर मोटारसायकल क्रमांक एमएच १५ बि.एस.१२५३ वरून जात असताना अज्ञात वाहनाने धडक दिल्याने जागीच ठार झाला.

घटनेची माहिती पोलीसांना मिळताच सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक एस.एन. थोरवे, पोहेका सुर्यकात केजगीर, रामकिशन कोंडरे, विष्णूदास गरूड, सुनिल वासलवार, हनुमान पावडे, आर.एस मगर, महामार्गचे बि. व्ही. गिराम, शिवाजी काळे, पोलीस मित्र, गजानन लांडगे वसीम इनामदार आदीनी घटनास्थळी भेट दिली. दरम्यान चारठाणा पोलीसांनी या घटनेची माहिती महामार्ग पोलीसांना दिल्यानंतर देवगाव फाटा येथे कर्तव्यावर असलेले बि. व्ही. गिराम, शिवाजी काळे यांनी एक कंटेनर पकडून चौकशीसाठी ताब्यात घेतले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news