APL Farmers Scheme | एपीएल शेतकरी योजनेसाठी आवश्यक निधीची तरतूद

Parbhani News | अन्नधान्याऐवजी 150 रूपयांऐवजी थेट 170 रोख रक्कम देण्याचा निर्णय महाराष्ट्र शासनाने घेतला आहे
ration card
रेशनकार्ड (File Photo)
Published on
Updated on

APL farmers direct cash transfer

एरंडेश्वर : एपीएल (केशरी रेशनकार्ड) शेतकरी योजनेतील पात्र लाभार्थी शेतकऱ्यांना धान्याऐवजी थेट रोख रक्कम खात्यात जमा होती. या रकमेत शासनाने वाढ केली आहे. छत्रपती संभाजीनगर, अमरावती आणि नागपूर विभागातील वर्धा जिल्ह्यातील एपीएल (केशरी) शिधापत्रिकाधारक शेतकऱ्यांना अन्नधान्याऐवजी 150 रूपयांऐवजी थेट 170 रोख रक्कम मिळते. 2025-26 या आर्थिक वर्षासाठी योजनेसाठी आवश्यक निधीची तरतूद केली असून, कोषागारातून थेट रक्कम हस्तांतरणासाठी संबंधित अधिकाऱ्यांना अधिकृत केले गेले आहे.

  • योजनेचा कालावधी: जानेवारी 2023 पासून सुरू

  • रक्कमेतील वाढ: एप्रिल 2024 पासून 150 वरून 170

  • निधी तरतूद: 2025-26 साठी लेखा तरतूद पूर्ण

  • हस्तांतरण प्रक्रिया: कोषागारातून थेट खात्यात रक्कम जमा

ration card
Parbhani Rain | परभणी जिल्ह्यात मुसळधार पावसाचा कहर : ढगफुटी, अतिवृष्टीमुळे जनजीवन विस्कळीत, पालमला रिमझीम

या योजनेअंतर्गत, जानेवारी 2023 पासून पात्र शेतकऱ्यांना 150 दरमहा थेट खात्यात जमा करण्यात येत होते. एप्रिल 2024 पासून ही रक्कम 170 करण्यात आली आहे. 2025-26 या आर्थिक वर्षासाठी योजनेसाठी आवश्यक निधीची तरतूद केली असून, कोषागारातून थेट रक्कम हस्तांतरणासाठी संबंधित अधिकाऱ्यांना अधिकृत केले गेले आहे.

शासनाच्या या निर्णयामुळे शेतकऱ्यांना अधिक लवचिकता मिळणार असून, त्यांना आवश्यक वस्तू खरेदीसाठी थेट रोख रक्कम मदत मिळणार आहे. हा उपक्रम शेतकऱ्यांच्या आर्थिक स्थैर्यासाठी आणि जीवनमान सुधारण्यासाठी महत्त्वाचा ठरेल, असे विभागीय अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.

ration card
परभणी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला राष्ट्रीय पुरस्कार

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news