

चारठाणा : बेकायदेशीर रित्या अवैध दारूची विक्री होत असल्याची माहिती चारठाणा पोलीसांना मिळाल्यानंतर २ हजार ५०० रूपयाची देशीदारू जप्त करून एका जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर कारवाई बुधवार दि २७ नोव्हेंबर रोजी सकाळी ११ वाजेच्या सुमारास करण्यात आली.
बोरकिनी देवगाव फाटा रस्यावर विना परवाना बेकायदेशीर रित्या अवैध दारूची विक्री होत असल्याची माहिती चारठाणा पोलिसांना मिळाल्यानंतर सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनिल अंधारे याच्या मार्गदर्शनाखाली हेड कॉन्स्टेबल. वसंत वसंत वाघमारे, रामकिशन कोंडरे यांना बोरकिनी रोडवर एक इसम दारू विक्री करत असल्याचे निदर्शनास आले. पोलिसांना पाहून दारूविक्रेता दारू सोडून पसार झाला दरम्यान पोलिसांनी देशीदारूच्या ३५ बॉटल हस्तगत करून घेतले या कारवाईत एकूण २ हजार ५०० रूपयांची देशीदारू जप्त करण्यात आली. या प्रकरणी पोहेका रामकिसन कोंडरे याच्या फिर्यादीवरून आरोपी दादाराव मुसळे याच्या विरुद्ध चारठाणा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा तपास सहायक पोलीस निरीक्षक सुनिल अंधारे याच्या मार्गदर्शनाखाली वंसत वाघमारे हे करीत आहेत.