परभणी : रुग्णालयातील साहित्य वृद्धाश्रमाला देऊन निभावले दायित्व

सेलू येथील डॉक्टर दांपत्याचा अभिनव उपक्रम
Doctor couple from Selu
सेलू येथील डॉक्टर दांपत्यPudhari Photo
Published on
Updated on

सेलू , पुढारी वृत्तसेवा;

येथील सुप्रसिद्ध हृदयरोग तज्ञ डॉ. श्रीनिवास कुलकर्णी व पॅथॉलाजी तज्ञ डॉ सौ.कल्पना कुलकर्णी यांनी सामाजिक बांधिलकी जपत आणि आपणही समाजाचे काही देणे लागतो याची जाणीव ठेवून आपल्या रुग्णालयातील सर्व साहित्य संभाजीनगर येथील " स्नेह सावली " या वृध्दाश्रमाला मोफत देऊन दायित्व निभावले आहे .यामध्ये ५ हौस्पिटलबेड,मॅट्रेस, कार्डियाक मॉनिटर , 2 जंबो आणि 1 छोटे ऑक्सिजन सिलेंडर, 2 आयव्ही स्टॅड, हॉट एअर ओव्हन, 3 साईड टेबल्स, स्टेबलायझर, ई सी जी मशीन, ईन्कुबेटर, 8 स्टेथोस्कोप , 4 बि.पी ऑपरेटस इत्यादी आवश्यक वस्तूचा समावेश आहे .याचा नक्कीच गरजू, वयस्क, रुग्णांना उपयोग होईल.

Doctor couple from Selu
कोल्हापूर : लॉकडाउनमध्ये काढलेल्या चित्रांच्या विक्रीतून शैक्षणिक मदत; दोन भावंडाची अनोखी सामाजिक बांधिलकी

सेलू येथे सुप्रसिद्ध हृदयरोग तज्ञ डॉ श्रीनिवास कुलकर्णी यांचे सुसज्ज रुग्णालय होते. त्यातच डॉ कल्पना कुलकर्णी यांची अद्यावत अशी पॅथॉलाजी होती. गेली कित्येक वर्षे त्यांनी अत्यावश्यक रुग्णांना सेवा दिली. परंतु कांही अपरिहार्य कारणास्तव त्यांना हे रुग्णालय बंद करावे लागले. त्यांनी सेलू येथून प्रवरानगर येथे स्थलांतर केले. आपल्या रुग्णालयातील आवश्यक वस्तुंचा गोरगरीब जनतेला फायदा व्हावा या उदात्त हेतूने त्यांनी हे सर्व साहित्य मोफत संभाजीनगर येथील "स्नेह सावली" या वृद्धाश्रमाला देण्याचा निर्णय घेतला. स्वतः वाहनाद्वारे सर्व साहित्य वृद्धाश्रमासाठी पाठवले आहे. या स्तुत्य उपक्रमाबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे. त्यांनी सामाजिक बांधीलकेतून केलेले हे कार्य निश्चितच कौतुकास्पद व दिशादर्शक ठरनारेच म्हणावे लागेल.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news