

चारठाणा, पुढारी वृत्तसेवा: मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे - पाटील यांच्या उपोषणाला पाठिंबा म्हणून चारठाणा येथील शिवतीर्थ येथे तीन दिवसांपासून निलेश चव्हाण यांनी उपोषण केले होते. मात्र, जरांगे यांनी उपोषण मागे घेतल्याने चव्हाण यांनीही आपले उपोषण आज (दि. २६) मागे घेतले. (Parbhani News)
यावेळी चव्हाण यांना सरपंच अनिरुद्ध चव्हाण व चारठाणा सज्जाचे तलाठी आर. एन. गायकवाड यांनी नारळ पाणी दिले. यावेळी सकल मराठा समाजाच्या वतीने जिंतूर तहसीलदारांना मराठा आरक्षण मागणीचे निवेदन देण्यात आले. यावेळी बीट जमादार उद्धव सातपुते, उद्धव माने, सकल मराठा समाज उपस्थित होते. (Parbhani News)