Parbhani News : मोरेगाव-वालूर रस्त्याचे काम मार्गी लावा

ग्रामस्थांची बांधकामच्या उपविभागीय अभियंत्यांकडे मागणी
Moregaon Valur road issue
Moregaon Valur road issuepudhari photo
Published on
Updated on

सेलू : तालूक्यातील महत्वाचा प्रजिमा 33 मोरेगाव ते वालूर रस्त्यावर नागरीकांना त्रासाचा सामना करावा लागत आहे. उखडलेल्या रस्त्यामूळे आपघाताचे प्रमाण वाढत आहे. रस्त्याचे काम तत्काळ पूर्ण करावे अशी मागणी सोमवारी (दि.11) ग्रामस्थांनी बांधकामच्या उपविभागीय अभियंत्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे.

मोरेगाव -वालूर प्रजिमा 33 हा रस्ता केंद्रिय महामार्ग निधी 2024-25 मध्ये मंजूर होवून रस्ता कामास जून 2025 मध्ये सूरूवात झाली. मागील जून महिन्यापासून केवळ रस्ता उखडून ठेवला. हा रस्ता उखडल्यामूळे नागरीकांना वाहने चालवताना त्रास होत असून वाहने स्लिप होवून आपघात होत आहेत. दरम्यान 15 जूनपासून शैक्षणिक वर्ष सूरू होत असून रस्त्यावरील हातनूर, साळेगाव, खेर्डा व रायपूर गावातील विद्यार्थी वालूर, मोरेगाव व सेलू येथे शिक्षणासाठी येतात. मात्र रस्त्याचे काम अर्धवट असल्याने यावरून पावसाळ्यात प्रवास करतांना त्रासाचा सामना करावा लागणार आहे.

Moregaon Valur road issue
Sangli News : उकरलेले रस्ते आणि रखडलेले पूल

यामुळे जून महिन्यापूर्वी हे काम पूर्ण करावे असे ग्रामस्थांनी म्हटले आहे. तात्काळ काम पूर्ण केले नाही तर येणाऱ्या 19मे रोजी मोरेगाव येथे ग्रामस्थांच्या वतिने रास्ता रोको आंदोलन करण्यात येईल असा इशारा देण्यात आला आहे.

याप्रसंगी सतिश काकडे, जयसिंग शेळके, विश्वास शेळके, दत्ता आंधळे, नागेश शेळके, माणिक शेळके, नामदेव बानाईत, राहूल काकडे, महेंद्र गाडे, सूभाष गाडे, गोविंद काकडे, राजेश राऊत, प्रकाश गायके, अन्सर शेख, शिवजीराव शेळके, रमेश काकडे, डाँ.संतोष काकडे, रामप्रसाद बोराडे, अंकूश खंदारे, सूनिल पूरी, विकास सहजराव, सचिन राऊत, दत्ता रोकडे, नागनाथ ठाकरे, मारोती राऊत, परमेश्वर आद्रट, गणेश आंधळे आदी उपस्थित होते.

Moregaon Valur road issue
Raigad News : रस्ते विकासकामामुळे शाळेच्या अस्तित्वालाच धोका

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news