

चारठाणा : हिवाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला नागपूरमध्ये रविवार दि १५ रोजी सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार सोहळा मोठ्या थाटात पार पडला. यात जिंतूर विधानसभा मतदारसंघाच्या आमदार सौ.मेघना बोर्डीकर साकोरे यांनी राज्यमंत्रीपदाची शपथ घेताचा चारठाणा बसस्थानक व पेठ विभागात फटाके फोडून जल्लोष साजरा करण्यात आला.
२०२४ च्या विधानसभा निवडणुकीत त्यांनाच संधी दिली होती. या निवडणुकीत दुसऱ्यांदा आमदार बनल्यानंतर संभाव्य मंत्रिपदाच्या यादीत त्यांचे नाव सुरुवातीपासून चर्चेत होते. रविवार दि १५ रोजी आ.मेघना बोर्डीकर यांचा शपथ विधी संपन्न होताच चारठाणा बसस्थानक परिसर व पेठ विभागात फटाके फोडून आनंदोत्सव साजरा करण्यात आला.
या वेळी विश्वंभर चव्हाण, दौलत देशमुख, परमेश्वर ढगे , संतोष चव्हाण , भाऊराव भवरे, अर्जुन चव्हाण, रूस्तुम देशमुख, राहुल चव्हाण, अमोल भवरे,बाळू चव्हाण, विलास देशमुख, बबन देशमुख, आनंद निकाळजे, सहदेव ढगे, याच्यासह अदीची उपस्थिती होती.