

पूर्णा : उद्धव बाळासाहेब ठाकरे (उबाठा) गटातील दिग्गजांसह कार्यकर्त्यांनी नामदार चंद्रशेखर बावनकुळे, परभणीच्या पालकमंत्री मेघनाताई बोर्डीकर, माजी आ. रामप्रसाद बोर्डीकर यांच्या उपस्थितीत बुधवारी (दि.२) भाजपात पक्षप्रवेश केला. यामुळे पूर्णा तालुक्यातील ठाकरेंच्या शिवसेनेला मोठी खिंडार पडली आहे. मुंबई येथील भाजपाच्या मध्यवर्ती कार्यालयात मार्केट कमिटीचे सभापती बालाजी खैरे पाटील यांच्यासह अनेकांनी भाजपात प्रवेश केला.
यावेळी माजी सभापती बालाजी देसाई, व्यंकटराव देसाई, उपसभापती नारायण पिसाळ, माजी जि.प सदस्य विश्वनाथ सोळंके, चेअरमन केशवराव खैरे, संतराम ढोणे, डॉ.जयप्रकाश मोदाणी, दिपक बोबडे, छबूराव लोखंडे, नामदेव ठाकूर, सरपंच उत्तमराव नादरे, बालाजी डाखोरे, आनंदराव सोनटक्के, माणिकराव बोकारे, कैलाश वाघ, माधवराव नादरे यांनीही भाजपात प्रवेश केला.