Parbhani News : काजू-बदाम पिस्‍त्‍याचीच चर्चा

Dry fruits controversy : परभणी : दुष्काळाची दाहकता लोप पावली
Dry fruits controversy
Dry fruits controversypudhari photo
Published on
Updated on

सुभाष कच्‍छवे

परभणी : शनिवारी (दि. १९) कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांच्‍या उपस्‍थितीत दुष्काळी परिस्‍थितीवर चर्चा करण्यासाठी बोलाविलेल्‍या मराठवाडास्‍तरीय बैठकीत लोकप्रतिनिधींनी काजू-बदाम, पिस्‍ता खाल्‍ल्‍याची जोरदार चर्चा रंगली. ज्‍या बैठकीनंतर मराठवाड्यातील दुष्काळाच्‍या दाहकतेवर चर्चा व्‍हायला पाहिजे होती, तसे काही घडलेच नाही. काजू-बदाम, पिस्ता, राज्‍यमंत्र्यांनी पाणी पिण्यासाठी वापरलेल्‍या काचेच्‍या बाटलीची चर्चा होत मूळ विषयच लोप पावल्‍याचे दिसून आले.

जवळपास संपूर्ण मराठवाडयात ४५ दिवसांहून अधिक पावसाचा खंड पडला असून पिके जळून खाक झाली आहेत. शेतकर्‍यांनी सोयाबीनसह अन्‍य पिकांना जगविण्यासाठी केलेला खर्च पाण्यात गेल्‍यागत अवस्‍था असून यामुळे मराठवाडाभर शेतकर्‍यांमध्ये नैराश्याचे वातावरण आहे. मराठवाडयाच्‍या दुष्काळी प्रश्नावर चर्चा करण्यासाठी बोलाविलेल्‍या बैठकीत दुष्काळ प्रश्नावर वादळी चर्चा होणे अपेक्षित असताना तसे काही घडले नाही.

Dry fruits controversy
Hingoli Crime : सिरसममध्ये पोलिसांचा मटका अड्ड्यावर छापा

बैठक खेळी-मेळीच्‍या वातावरणात पार पडल्‍याचे चित्र पहायला मिळाले. मराठवाडाभर असंतोष असताना लोकप्रतिनिधीनीही मग ते सत्ताधारी असोत की विरोधक यांनी प्रशासन व सरकारकडे दुष्काळ परिस्‍थितीकडे गांभिर्याने पाहून त्‍यावर उपाययोजना कराव्‍या, अशी मागणी केलेलीच आहे. राज्‍यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांनी नांदेड येथे झालेल्‍या बैठकीपूर्वीच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेवून दुष्काळग्रस्‍त शेतकर्‍यांना आर्थिक मदत देण्याची मागणी केली होती.

खा. संजय जाधव, आ. राजेश विटेकर, आ. रत्‍नाकर गुट्टे, आ.डॉ. राहुल पाटील यांच्‍यासह आजी-माजी लोकप्रतिनिधीनींही मराठवाडयात दुष्काळ जाहीर करावा, अशी मागणी केली होती. नांदेड येथे पार पडलेल्‍या बैठकीनंतर दुष्काळाच्‍या दाहकतेविषयी व शेतकर्‍यांच्‍या आर्त किंकाळ्याविषयी माध्यमांसह सर्वदूर चर्चा होणे अपेक्षित असताना तसे काही घडले नाही. खा. संजय जाधव या बैठकीत काजू-बदाम खातानाचा व्‍हिडीओ, वृत्तवाहिन्‍या व समाज माध्यमांवर प्रसारीत झाल्‍यानंतर पत्रकारांनी दुष्काळी परिस्‍थितीत काजू-बदाम कसे खाता? असा प्रश्न खा. संजय जाधव यांना उपस्‍थित केला.

यावर खा. जाधव पत्रकारांना भडकत त्‍यांनी पत्रकारांनाच उलट प्रश्न केले. आम्‍ही काही काजू-बदामाची मागणी केली नव्‍हती. हा प्रश्न तुम्‍ही जिल्‍हाधिकार्‍यांना विचारा, असा सल्‍ला पत्रकारांना दिला. तुमच्‍या समोर ताट ठेवले तर तुम्‍ही खाणार नाही का? असा प्रतिप्रश्नही पत्रकारांना केला. वास्‍तविक पाहता खा. संजय जाधव यांना हा विषय जागेवरही संपवता आला असता, परंतु त्‍यांच्‍या नेहमीच्‍या स्‍वभावानुसार तसे काही घडले नाही.

Dry fruits controversy
Latur Crime : अध्यक्षांच्या निवासस्थानातील चोरीवरून जि.प.ची सर्वसाधारण सभा गाजली

दुष्काळी परिस्‍थितीवर उपाययोजना करण्यासाठी आयोजित बैठकीत चर्चा मात्र काजू, बदाम, पिस्‍ता आणि पालकमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांनी पाणी पिण्यासाठी वापरलेल्‍या काचेच्‍याच बाटलीची जोरदार चर्चा झाली. ती अजुनही सुरुच आहे. ज्‍या बैठकीत दुष्काळी प्रश्नावर चर्चा व्‍हायला पाहिजे होती, तसे काही घडले नाही आणि दुष्काळाची दाहकता लोप पावल्‍याचे दिसून आले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news