Parbhani Crime : अवैध दारू विक्रीवर धाड; तिघांविरुद्ध गुन्हे दाखल

एकूण १० हजार ८० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत
Crime News
Crime Newspudhari photo
Published on: 
Updated on: 

मानवत : पोलिसांच्या पथकाने अवैध दारूविक्री विरोधात सलग दोन दिवस विशेष मोहिमेतून तीन ठिकाणी छापे टाकून देशी दारूच्या १२६ बाटल्या जप्त केल्या. यात एकूण १० हजार ८० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला असून तिघांविरुद्ध गुन्हे दाखल केले.

२४ सप्टेंबर रोजी पोशि बंकट लटपटे यांच्या फिर्यादीवरून हटकरवाडी ते शिरशी रस्त्यावर चंद्रकला नंदू शिंदे कडून देशी दारूच्या ८ बाटल्या जप्त केल्या. त्याच दिवशी पोलीस कर्मचारी सूर्यकांत फड यांच्या फिर्यादीवरून मानवत हद्दीतील सार्वजनिक रस्त्यावर काशीनाथ तुकाराम कांदे कडून देशी दारूच्या ९६ बाटल्या जप्त केल्या.

Crime News
Sunetra Pawar : शेतकऱ्यांनो स्‍वत:ला एकटे समजू नका, शासन सोबत

नंतर २५ सप्टेंबर रोजी पोलीस कर्मचारी माणिक डुकरे यांच्या फिर्यादीवरून कोथळा-राजुरा मार्गावर छापा टाकला. यात युसुफ अली शेख कडून देशी दारूच्या २२ बाटल्या जप्त केल्या.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

पुणे शहरातील सर्व अपडेट्स आता WhatsApp वर; आत्ताच जॉईन करा
logo
Pudhari News
pudhari.news