ममदापूर, कानडखेड परिसरात बिबट्याचा वावर वाढला; पाळीव प्राण्यांवरील हल्ल्याचे सत्र सुरुच

Parbhani Leopard Attacks | शेतकरी, नागरिक भयभीत
Kanadkhed Leopard sightings
कानडखेड येथील ओढ्यात बिबट्या आढळून आला. Pudhari Photo
Published on
Updated on
आनंद ढोणे

पूर्णा: बिबट्याने ममदापूर येथील शेतकरी संजय काळबांडे यांची दोन वासरे तर कानडखेड येथील शेतकरी साहेब सुर्यवंशी यांच्या शेळीसह पिल्ल्याचा फडशा पाडल्याची घटना ताजी असताना कानखेड येथील शेतकरी घनश्याम अनंता कदम यांच्या कुत्र्यावर बिबट्याने गुरूवारी हल्ला चढवला. तर आज (दि. ३१) दुपारी ३ वाजता कानडखेड येथील शेतकरी शिवराम डाढाळे शेतातून घराकडे जाताना ओढ्यात त्यांना बिबट्या आढळून आला. त्यामुळे शेतकरी, नागरिक भयभीत झाले आहेत.

परभणी येथील वनाधिका-याची उदासीनता

दरम्यान, पूर्णा तालुक्यातील कानडखेड शिवारात बिबट्याचा आधी रात्रीच्या सुमारास तर आता दिवसा वावर आढळला आहे. शेतकऱ्यांनी फोनवर संपर्क करुनही परभणी येथील वनपरिक्षेत्र विभागाचे अधिकारी, कर्मचारी दखल घेत नसल्याची तक्रार शेतकऱ्यांतून केली जात आहे. ममदापूर कान्हेगाव शेतशिवारात एकदा वनविभागाचे पथक येऊन गेले होते. परंतु, त्यानंतर बिबट्याकडून पाळीव प्राण्यांची शिकार सुरूच आहे.

शेतशिवारात वावरत असताना किंवा शेतीकाम करताना अचानक बिबट्या दिसला. तर घाबरून न जाता प्रसंगावधान राखून संरक्षित स्थळी जावे. तसेच तत्काळ पोलीस पाटील किंवा वनखात्यास कळवावे. शेतात एकटे न जाता समुहाने जावे. मोबाईलवर गाणी चालू ठेवावीत. जेणेकरून बिबट्या आवाजाने जवळ येणार नाही. बिबट्या किंवा अन्य हिंस्र रानटी प्राण्यासही माणसासारखीच जिवाची भीती असते. मात्र एकटे न जाता समूहाने रहावे.

- निलोफर शेख, वनाधिकारी वनपरिक्षेत्र परभणी

Kanadkhed Leopard sightings
परभणी: ...तर सकल मराठा समाजाचे 'बोंबमारो' आंदोलन

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news