Parbhani |कौसडी ग्रामपंचायतीच्या कथित भ्रष्टाचाराच्या चौकशीसाठी शनिवारी आंदोलन

कौसडी ग्रामपंचायतीच्या कथित भ्रष्टाचाराच्या चौकशीसाठी शनिवारी आंदोलन
corruption
corruption file photo
Published on: 
Updated on: 

बोरी (परभणी) : कौसडी ग्रामपंचायतीच्या कारभारातील कथित भ्रष्टाचाराची चौकशी करून संबंधित प्रकरणाचा जाब जनतेसमोर मांडावा, या मागणीसाठी कौसडी येथे आंदोलन करण्यात येणार आहे. गणेश विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर २५ सप्टेंबर रोजी नियोजित केलेले आंदोलन बोरी पोलिसांच्या विनंतीला मान देत पुढे ढकलण्यात आला आहे. आता शनिवार, २६ सप्टेंबर २०२६ रोजी आंदोलन करण्यात येणार आहे.

कौसडी ग्रामपंचायतीच्या कारभाराबाबत नागरिक व युवकांकडून कथित भ्रष्टाचाराच्या चौकशीची मागणी करण्यात येत आहे. या मागणीसाठी कौसडी येथील पाण्याच्या टाकीवर चढून आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे. आंदोलनाचे ठिकाण पाण्याची टाकी, कौसडी असे जाहीर करण्यात आले आहे.

ग्रामपंचायतीच्या कारभारातील कथित अनियमितता व भ्रष्टाचाराची सखोल चौकशी करून वस्तुस्थिती जनतेसमोर आणावी, तसेच ग्रामपंचायतीच्या कामकाजात पारदर्शकता ठेवावी, अशी मागणी आंदोलनकर्त्यांकडून करण्यात येत आहे. दरम्यान, २५ सप्टेंबर रोजी गणेश विसर्जन असल्याने कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने बोरी पोलिसांनी आंदोलनाची तारीख पुढे ढकलण्याची विनंती केली होती. पोलिसांच्या विनंतीला मान देत २५ सप्टेंबरचे आंदोलन पुढे ढकलून २६ सप्टेंबर रोजी आंदोलन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने कौसडी ग्रामपंचायतीसंदर्भातील तक्रारींची गांभीर्याने दखल घेऊन आवश्यक ती चौकशी करावी आणि चौकशीअंती वस्तुस्थिती जनतेसमोर मांडावी, अशी मागणी होत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

पुणे शहरातील सर्व अपडेट्स आता WhatsApp वर; आत्ताच जॉईन करा
logo
Pudhari News
pudhari.news