‌Jintur Illegal Sand Mining : ‘त्या‌’ तलाठ्याला खुलासा सादर करण्याचे आदेश

अवैध वाळू उपसा प्रकरण
Jintur Illegal Sand Mining
Jintur Illegal Sand Miningpudhari photo
Published on
Updated on

जिंतूर : तालुक्यातील करपरा नदीपात्रातून अवैध वाळू उपसा करून तिची ट्रॅक्टरद्वारे वाहतूक सुरू असताना दुधगाव सज्जाचे तलाठी शेख खलील यांनी कोणतीही कारवाई न करता संबंधित ट्रॅक्टर सोडून दिल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला. याबाबत विविध दैनिकांमध्ये वृत्त प्रसिध्द होताच महसूल प्रशासन खडबडून जागे झाले.

तहसीलदार शीतल कच्छवे यांनी दि.30 जानेवारी रोजी तलाठी शेख खलील यांना नोटीस बजावत तीन दिवसांच्या आत प्रत्यक्ष उपस्थित राहून लेखी खुलासा सादर करण्याचे आदेश दिले आहेत. खुलासा न केल्यास योग्य ती कारवाई करण्यात येईल, असेही नोटीसीत नमूद करण्यात आले.

Jintur Illegal Sand Mining
Parbhani ZPElection : झेडपी निवडणुकीत राष्ट्रवादीसमोर भाजपचे आव्हान

प्राप्त माहितीनुसार, दि.27 जानेवारी रोजी दुपारी साडेबारा वाजेच्या सुमारास अवैध वाळू वाहतूक करणारा एक ट्रॅक्टर तलाठी शेख खलील यांच्या निदर्शनास आला होता. विशेष म्हणजे, तलाठी हे त्या ट्रॅक्टरच्या हेडवर बसून सुमारे एक ते दीड किमी अंतर पार करतानाही कोणतीही कारवाई करण्यात आली नाही. नंतर ट्रॅक्टर मालक घटनास्थळी आल्यानंतर त्याच्याशी संभाषण झाल्यानंतर तलाठी खाली उतरले आणि कोणतीही कायदेशीर कारवाई न करता ट्रॅक्टर सोडून दिला.

या घटनेचे फोटो विविध दैनिकांत प्रसिध्द झाल्यानंतर महसूल प्रशासनावर दबाव वाढला. काही वर्तमानपत्रे तसेच गावकऱ्यांच्या निवेदनांचा संदर्भ देत तहसीलदारांनी ही नोटीस बजावल्याचे समजते. 27 जानेवारी रोजी अवैध वाळूने भरलेल्या ट्रॅक्टरच्या हेडवर दुधगावचे तलाठी शेख खलील बसल्याचे छायाचित्र स्पष्ट दिसते.

Jintur Illegal Sand Mining
Nanded Akashvani : जिथे कट्टरतावादाची चेतना...तिथे भक्तिसंगीत चालेना...!

या दिवशी एकाही अवैध वाळू वाहतूक ट्रॅक्टरवर कारवाई केली नाही. तलाठी शेख खलील यांचे वाळू माफियांशी सलोख्याचे संबंध असल्याची चर्चा गावकऱ्यांत आहे. मोबाईल कॉल डिटेल रेकॉर्ड तपासल्यास सत्य बाहेर येण्याची दाट शक्यता असल्याचे बोलले जात आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news