रुग्णालयांचा घातक कचरा थेट ब्रम्हाळ नदीत

पूर्णा येथील प्रकार; लोखंडी सुई, रक्तयुक्त पट्टयांमुळे जनावरांच्या आरोग्यास धोका
Parbhani News
रुग्णालयांचा घातक कचरा थेट ब्रम्हाळ नदीतFile Photo
Published on
Updated on

Hazardous hospital waste is being dumped directly into the Bramhal River

पूर्णा, पुढारी वृत्तसेवा : शहरातील काही खाजगी तसेच इतर रुग्णालयांकडून उपचारानंतर निर्माण होणारा जैव-वैद्यकीय घनकचरा (बायो मेडिकल वेस्ट) नियमबाह्य पध्दतीने थेट ब्रम्हाळ नदीच्या पात्रात फेकून दिला जात असल्याचे गंभीर प्रकार उघडकीस आले. या कचऱ्यात स्टीलच्या लोखंडी सुई, सिरींज, सलाईनच्या प्लास्टिक बाटल्या, रक्ताने माखलेल्या पट्ट्या, औषधांचे अवशेष व इतर घातक वैद्यकीय साहित्य आढळून येत असून यामुळे नदीकाठावरील शेतकऱ्यांच्या जनावरांचे आरोग्य धोक्यात आले.

Parbhani News
Parbhani News : भाजपच्या प्रतिष्ठेची, तर राष्ट्रवादीच्या अस्तित्वाची लढाई !

पूर्णा शहरात अनेक खाजगी रुग्णालये, दवाखाने व नर्सिंग होम आहेत. येथे दररोज मोठ्या प्रमाणात रुग्णांवर उपचार केले जातात. उपचारानंतर निर्माण होणारा वैद्यकीय कचरा हा अत्यंत घातक स्वरूपाचा असून, तो नियमानुसार स्वतंत्र बायो-मेडिकल वेस्ट वाहनाद्वारे संकलित करून अधिकृत प्रकल्पात नष्ट करणे बंधनकारक आहे. मात्र प्रत्यक्षात काही रुग्णालयांकडून हा कचरा संबंधित वाहनात न देता शहरालगतच्या ब्रम्हाळ नदी पात्रात नेऊन टाकला जात असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.

ब्रम्हाळ नदी काठावर मोठ्या प्रमाणात जनावरे चरण्यासाठी सोडली जातात. नदीपात्रात टाकलेल्या लोखंडी सुई जनावरांच्या पायात टोचण्याची शक्यता वाढली असून, रक्तयुक्त पट्ट्या किंवा प्लास्टिक साहित्य जनावरांनी खाल्ल्यास त्यांचा मृत्यू होण्याची भीती व्यक्त होत आहे. काही शेतकऱ्यांनी जनावरांना जखमा झाल्याच्या तक्रारीही केल्या असून, या प्रकारामुळे शेतकऱ्यांतुन तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. या संपूर्ण प्रकरणाकडे शासकीय आरोग्य विभागाचे अधिकारी जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचा आरोप नागरिकांकडून होत आहे.

Parbhani News
Purna News | पूर्णा जिल्हा परिषद : उमेदवार निवडीसाठी राजकीय पक्षांची होतेय दमछाक

नियमांचे सर्रास उल्लंघन होत असतानाही संबंधित रुग्णालयांवर कोणतीही ठोस कारवाई होत नसल्याने प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत. ब्रम्हाळ नदीचे प्रदूषण थांबवण्यासाठी दोषी रुग्णालयांवर तातडीने गुन्हे दाखल करून त्यांचे परवाने रद्द करावेत, तसेच नियमबाह्य खाजगी रुग्णालय चालवणाऱ्या शासकीय वैद्यकीय अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी नागरिक व शेतकऱ्यांतून होत आहे. प्रशासनाने वेळेत पावले न उचलल्यास आंदोलन छेडण्याचा इशाराही नागरिकांनी दिला आहे.

शासकीय वैद्यकीय अधिकाऱ्यांची खासगी रुग्णालये

दरम्यान पूर्णा ग्रामीण शासकीय रुग्णालयात कार्यरत काही वैद्यकीय अधिकारी नियम धाब्यावर बसवून शहरात स्वतःचौ खाजगी रुग्णालये चालवत असल्याचाही आरोप होत आहे. शासकीय सेवेत असताना खाजगी रुग्णालय चालवण्यास मनाई असतानाही अनेक अधिकाऱ्यांनी मोठ्या इमारती उभारून खाजगी वैद्यकीय व्यवसाय सुरू केल्याचे बोलले जात आहे. नागरिकांच्या म्हणण्यानुसार, हे अधिकारी शासकीय रुग्णालयात केवळ नावापुरती सेवा देत असून, खाजगी रुग्णालयांकडे अधिक लक्ष केंद्रित करत आहेत. त्यामुळे शासकीय आरोग्य सेवांचा दर्जा खालावत असल्याची तक्रारही करण्यात येत आहेत. या प्रकरणात वरिष्ठ आरोग्य अधिकाऱ्यांकडून कोणतीही कारवाई न होता उलट संबंधित डॉक्टरांना पाठीशी घातले जात असल्याची चर्चा शहरात आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news