

Congress political leader dead in Manwat Parbhani
मानवत: काँग्रेसचे माजी शहराध्यक्ष, माजी नगरसेवक व शिवसेना शिंदे गटाचे नेते श्याम भाऊ चव्हाण (रा. रिंग रोड, महाराणा प्रताप चौक) यांनी घराच्या मागे असलेल्या गोदामात गळफास घेऊन आपले जीवन संपविले. ही घटना गुरुवारी (दि. १९) दुपारी घडली. या घटनेमुळे शहरात व राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.
मानवत ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले. या घटनेचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. त्यांच्या पश्चात आई-वडील, पत्नी, दोन मुले, तीन भाऊ व दोन बहिणी असा मोठा परिवार आहे.
चव्हाण यांनी विधानसभा निवडणुकीवेळी शिवसेना शिंदे गटाचे अल्पसंख्यांक आघाडीचे प्रदेशाध्यक्ष सईद खान यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेत समर्थकांसह प्रवेश केला होता.