

परभणी / मानवत : मानवत तालुक्यातील श्रीक्षेत्र यशवाडी येथील सुप्रसिध्द जागृत त्रिमूर्ती हनुमान मंदिरात शनिवारी (दि.20) दुपारी 3 वाजण्याच्या सुमारास सभामंडपाचे काम सुरू असताना स्लॅब कोसळून झालेल्या दुर्दैवी घटनेत दर्शनासाठी आलेल्या ५ भाविकांचा मृत्यू झाला असून जवळपास २० जण जखमी झाले आहेत. या दुर्दैवी घटनेबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दुःख व्यक्त केले असून मयतांच्या कुटुंबीयांना पाच लाखांची मदत जाहीर केली आहे.
घटनास्थळी धावले लोकप्रतिनिधी
यशवाडी येथील घटनेनंतर आ.राजेश विटेकर यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. शिवसेना अल्पसंख्याक विभागाचे प्रदेशाध्यक्ष सईद खान, उबाठाचे परभणी महानगरप्रमुख डॉ.विवेक नावंदर यांच्यासह अन्य लोकप्रतिनिधी व पदाधिकार्यांनी घटनास्थळी धाव घेतली. पालकमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर, खा.संजय जाधव, आ.डॉ.राहुल पाटील यांनीही घटनेविषयी तीव्र दु:ख व्यक्त केले आहे.