Online Urea Booking : ऑनलाईन युरिया बुकिंग करूनही खत मिळेना

अनेक शेतकऱ्यांनी ऑनलाइन युरिया बुकिंग करूनही त्यांना वेळेवर खत मिळत नसल्याची तक्रार केली आहे.
Urea supply
Urea Supply : कन्नड तालुक्यात शेतकऱ्यांना युरिया मिळेना, मागणीपेक्षा पुरवठा कमी, शेतकऱ्यांची अडवणूक Pudhari News Network
Published on
Updated on

Fertilizer not available despite online urea booking

सुलतानपूर, पुढारी वृत्तसेवा : शासनाने खत वितरण प्रक्रियेत पारदर्शकता यावी आणि शेतकऱ्यांना वेळेवर खत उपलब्ध व्हावे यासाठी ऑनलाइन बुकिंग व्यवस्था सुरू केली आहे. मात्र खुलताबाद तालुक्यात ही व्यवस्था केवळ कागदोपत्रीच असल्याचे चित्र दिसून येत आहे. अनेक शेतकऱ्यांनी ऑनलाइन युरिया बुकिंग करूनही त्यांना वेळेवर खत मिळत नसल्याची तक्रार केली आहे.

Urea supply
Umri fertilizer fraud | उमरीत खताच्या बॅगेत आढळली वाळू

सध्या खरीप हंगामाची लगबग सुरू असून पिकांना युरियाची अत्यंत गरज आहे. अशा वेळी अनेक शेतकरी कृषी सेवा केंद्रांवर ऑनलाइन नोंदणीचा पुरावा घेऊन पोहोचत असतानाही त्यांना "खत उपलब्ध नाही", "उद्या या", "साठा संपला" अशी कारणे देत वारंवार परत पाठवले जात असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे.

विशेष म्हणजे, काही कृषी सेवा केंद्रांवर केवळ आपल्या मर्जीतील किंवा ओळखीच्या शेतकऱ्यांनाच खताचे वितरण केले जात असल्याची चर्चा असून त्यामुळे इतर शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे. ऑनलाइन बुकिंग केलेल्या शेतकऱ्यांना डावलून इतरांना खत वाटप होत असल्याचा आरोपही काही शेतकऱ्यांनी केला आहे.

Urea supply
Soygaon Fertilizer Issue : ऑनलाईन खत विक्रीचा फज्जा; शेतकरी-विक्रेते हैराण

यामुळे शासनाच्या ऑनलाइन व्यवस्थेच्या विश्वासार्हतेवरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. युरियाभावी पिकांच्या वाढीवर परिणाम होण्याची भीती शेतकरी व्यक्त करत आहेत. वेळेवर खत न मिळाल्यास उत्पादनात घट होण्याची शक्यता असल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. संबंधित कृषी सेवा केंद्रांच्या कारभाराची चौकशी करून दोषी आढळणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात यावी अशी अपेक्षा शेतकरी व्यक्त करत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news