Purna Railway Accident | गौर शिवारात रेल्वेच्या धडकेत शेतकऱ्याचा मृत्यू

पूर्णा–पटणा जलदगती रेल्वेच्या इंजिनला धडक लागून मृत्यू
Farmer Death Purna-Nanded Railway
कैलास जोगदंडPudhari
Published on
Updated on

Farmer Death Purna-Nanded Railway

पूर्णा : तालुक्यातील पूर्णा–नांदेड लोहमार्गावर गौर शिवारात धावत्या रेल्वेची धडक लागून ३५ वर्षीय शेतकऱ्याचा जागीच मृत्यू झाला. पूर्णा–पटणा जलदगती रेल्वेच्या इंजिनला धडक लागल्याने हा अपघात घडला. कैलास चिंतामणी जोगदंड (वय ३५, रा. गौर, ता. पूर्णा, जि. परभणी) असे अपघातातील मृताचे नाव आहे.

या भीषण अपघातात तरुणाच्या डोक्याचा चेंदामेंदा झाला. डावा हातही तुटून पडला. अपघात घडल्यानंतर काही अंतरावर रेल्वे थांबवून चालकाने पुढील स्थानकाला घटनेची माहिती दिली.

माहिती मिळताच चुडावा पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक सुशांत किनगे, फौजदार नारमोड, पोहेका वसंत राठोड तसेच पोलिस कर्मचारी विलास मिटके, ज्ञानेश्वर घाळेवाड, सुधीर गायकवाड, राजू इंगळे आणि रामकिशन पांचाळ यांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. त्यानंतर मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला.

याबाबत अधिक माहिती अशी की, कैलास जोगदंड सकाळी पूर्णेला जात असल्याचे सांगून घराबाहेर पडले होते. त्यानंतर दुपारी पूर्णा–चुडावा लोहमार्गावर त्यांचा रेल्वेखाली मृत्यू झाल्याची माहिती त्यांच्या भावाने, गजानन जोगदंड यांनी चुडावा पोलीस ठाण्यात दिली.

या प्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास बिट जमादार राठोड करत आहेत. मृताच्या पश्चात आई, भाऊ, पत्नी, मुलगा, मुलगी असा परिवार असून या घटनेमुळे गौर गावात शोककळा पसरली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news