निळा येथे विद्युत तारेला स्‍पर्श झाल्‍याने शेतक-याचा मृत्यू

परभणी : निळा येथे विद्यूत तारेच्या धक्‍क्‍याने शेतक-याचा मृत्यू
parbhani news
परभणी : निळा येथे विद्यूत तारेच्या धक्‍क्‍याने शेतक-याचा मृत्यू pudhari photo

पूर्णा : तालूक्यातील निळा जुना गाव येथील शेत शिवारात आज सोमवारी ( दि. २२ जुलै) रोजी सकाळी ८ वाजण्याच्या सुमारास काम करताना एका शेतक-याला विद्यूत तारेचा शॉक लागला. या शेतक-याचा परभणी येथे उपचारादरम्यान मृत्यू झाला. या शेतकऱ्याचे नाव दिलीप उमराव सुर्यवंशी (वय ३२ वर्ष ) असे आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, पूर्णा तालूक्यातील निळा जुना गाव शेत शिवारात दिलीप उमराव सुर्यवंशी यांना आज (दि. २२ जुलै) रोजी सकाळी ८ वाजण्याच्या सुमारास काम करताना मोकळ्या जागेत आणि चालू असलेल्या विजेच्या तारेला धक्का लागला. जोरदार विद्युतचा शॉक लागल्याने शेतकरी दिलीप सुर्यवंशी खाली कोसळले.

parbhani news
चंद्रपूर : गोसेखुर्द प्रकल्पातील कालव्याच्या कामावर विद्यूत शॉक लागून कामगाराचा मृत्यू

दिलीप हे बेशुध्द अवस्थेत असता जवळील नातेवाईक‌ांनी तात्काळ ताडकळस येथील दवाखान्यात प्राथमिक उपचार करुन परभणी येथे पुढील उपचारासाठी नेले. यानंतर उपचारादरम्यान डॉक्टरांनी त्याला मृत झाल्याचे घोषित केलं. या अचानक घडलेल्या घटनेमुळे निळा गावावर शोककळा पसरली आहे. दिलीप सुर्यवंशी यांच्यापश्चात आई, भाऊ, पत्नी, दोन मुली असा परिवार आहे.

parbhani news
परभणी : धोतरा येथे विद्युत तारेचा शॉक लागून तरुणाचा मृत्यू

शॉक लागूनही बचावले साहेबराव सुर्यवंशी

दरम्यान, सुरुवातीला दिलीप सुर्यवंशी यांना जोरदार विजेचा शॉक लागून ते जमिनीवर कोसळले. यानंतर त्यांना काय झाले? म्हणून काही अंतरावर असलेले साहेबराव रंगराव सुर्यवंशी धावत जावून जमिनीवर पडलेल्या दिलीपला स्पर्श केला. यानंतर त्यांनाही विजेचा शॉक बसला आणि ते दूर फेकले गेले. साहेबरावला विजेचा कमी धक्का बसल्याने ते बचावले.

parbhani news
औरंगाबाद : चनकवाडी येथे हिटरचा शॉक लागून एकाचा मृत्यू

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news