

जिंतूर, पुढारी वृत्तसेवा : शहरात गणेशोत्सवानिमित्त वंदे मातरम् गणेश मंडळाच्या वतीने बांबूपासून तयार करण्यात आलेली पर्यावरणपूरक श्री गणेशाची मूर्ती सर्वांचे लक्ष वेधत आहे.
सध्या सर्वत्र गणेशोत्सवाची धूम सुरू असून प्रत्येक गणेश मंडळांनी श्रींच्या देखण्या मूर्तीची प्रतिष्ठापना केली. शहरातील वंदे मातरम् गणेश मित्रमंडळाच्या वतीने परंपरा कायम राखत पर्यावरणपूरक अशी गणेशमूर्ती साकारली. ती बांबूच्या साहित्यापासून बनवली असून सुदंर व देखणी गणेशमूर्ती सर्वांचे लक्ष वेधत आहे.
गणेश उत्सवानिमित्त ही पर्यावरणपूरक श्रींची मूर्ती उत्तम सामाजिक संदेश देत आहे. मंडळाचे संस्थापक अध्यक्ष दिवंगत मुंजाभाऊ रोकडे यांनी २४ वर्षापासून ही परंपरा कायम राखत आदर्श निर्माण केला.
बांबूपासून तयार केलेल्या सूप, टोपली, बांबू पट्टी आदींचा वापर केला. ही पर्यावरणपूरक श्रींची मूर्ती लक्ष वेधत आहे. उत्सवासाठी दिलीपराव दुर्गावकर, गंगाप्रसाद घुगे, अरविंद कटारे, सतीश जोरगेवार, रमेश संगेकर, विनोद राठोड, सम्राट अंभुरे, राजेश जोरगेवार, अंकुश चव्हाण यांच्या मार्गदर्शनात अध्यक्ष राहुल राऊत, उपाध्यक्ष रामेश्वर चव्हाण, शिवराज हळदे, गोपाळ रोकडे, राजू हुलगुंडे, आजी माजी सदस्य व पदाधिकारी हे परिश्रम घेत आहेत.