dr. Dhananjay Kale Organ Donation |मृत्यूनंतरही जीवनदान : डॉ. धनंजय काळेंच्या अवयवदानातून सहा जणांना नवे आयुष्य

dr. Dhananjay Kale Organ Donation | त्यांच्या या त्यागामुळे संपूर्ण परिसरात शोकासोबतच कृतज्ञतेची भावना पसरली असून, अवयवदानाबाबत समाजात सकारात्मक जागृती निर्माण झाली आहे.
dr. Dhananjay Kale Organ Donation
dr. Dhananjay Kale Organ Donation
Published on
Updated on

एरंडेश्वर (ता. पूर्णा) येथील रहिवासी व बीएचएमएस (BHMS) शिक्षण घेत असलेले विद्यार्थी धनंजय अनंत काळे यांचे अपघाती निधन झाले असले, तरी त्यांच्या अवयवदानामुळे सहा गंभीर आजारी रुग्णांना नवे जीवन मिळाले आहे. त्यांच्या या त्यागामुळे संपूर्ण परिसरात शोकासोबतच कृतज्ञतेची भावना पसरली असून, अवयवदानाबाबत समाजात सकारात्मक जागृती निर्माण झाली आहे.

dr. Dhananjay Kale Organ Donation
Parbhani Municipal Election | परभणी महापालिकेच्या ६५ जागांसाठी ४११ उमेदवार रिंगणात

धनंजय अनंत काळे यांचा काही दिवसांपूर्वी दुर्दैवी अपघात झाला होता. गंभीर जखमी अवस्थेत त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी अथक प्रयत्न केले; मात्र वैद्यकीय तपासणीनंतर त्यांना मेंदूमृत घोषित करण्यात आले. हा क्षण कुटुंबीयांसाठी अत्यंत दुःखद असतानाही, वैद्यकीय क्षेत्राशी संबंधित असलेल्या त्यांच्या कुटुंबीयांनी अत्यंत धैर्याने आणि सामाजिक भान ठेवून अवयवदानाचा निर्णय घेतला.

या निर्णयामुळे डॉ. धनंजय काळे यांचे मूत्रपिंड, यकृत, नेत्रांसह इतर आवश्यक अवयव प्रत्यारोपणासाठी वापरण्यात आले. विविध रुग्णालयांत उपचार घेत असलेल्या सहा रुग्णांना या अवयवांमुळे जीवनदान मिळाले आहे. मृत्यूनंतरही एखाद्याने इतरांचे प्राण वाचवावेत, हा समाजासाठी अत्यंत प्रेरणादायी संदेश असल्याचे आरोग्य क्षेत्रातील तज्ज्ञांचे मत आहे.

अवयव वेळेत पोहोचवण्यासाठी जालना ते पुणे दरम्यान ग्रीन कॉरिडॉर उभारण्यात आला. वाहतूक कोंडी टाळून रुग्णवाहिकेला सुरक्षित व वेगवान मार्ग उपलब्ध करून देण्यासाठी पोलिस प्रशासनाने विशेष नियोजन केले. अवयव वाहतुकीदरम्यान पोलिसांनी दाखवलेली तत्परता आणि संवेदनशीलता उपस्थित नागरिकांच्या डोळ्यांत पाणी आणणारी ठरली. अनेक ठिकाणी नागरिकांनी हात जोडून रुग्णवाहिकेला मार्ग मोकळा करून दिला.

धनंजय काळे यांचे स्वतःचे स्वप्न अपूर्ण राहिले असले, तरी त्यांच्या त्यागामुळे सहा कुटुंबांचे आयुष्य पुन्हा उजळले आहे. या कुटुंबांनी धनंजय व त्यांच्या परिवाराबद्दल कृतज्ञता व्यक्त केली आहे. “आम्हाला नवे जीवन देणारा हा अनोळखी देवदूत आम्ही आयुष्यभर विसरणार नाही,” अशा भावना अनेक रुग्णांच्या नातेवाइकांनी व्यक्त केल्या.

dr. Dhananjay Kale Organ Donation
Mango Trees Bloomed | पौष महिना सुरू होताच आंब्याला मोहोर; यंदा अंबराई बहरण्याचे संकेत

धनंजय यांच्या कुटुंबीयांचा हा निर्णय आज संपूर्ण समाजासाठी एक प्रेरणादायी दीपस्तंभ ठरत आहे. अवयवदानाबाबत असलेले गैरसमज दूर करून, गरजू रुग्णांसाठी जीवनाचा प्रकाश बनण्याचा संदेश या घटनेतून मिळतो आहे. दुःखाच्या क्षणीही समाजासाठी उभे राहणाऱ्या काळे कुटुंबीयांचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.

धनंजय आज आपल्यात नसले, तरी सहा जणांच्या श्वासात, दृष्टित आणि आयुष्यात ते कायम जिवंत राहणार आहेत आणि हीच त्यांच्या आयुष्याची खरी अमरता आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news