

पूर्णा, पुढारी वृत्तसेवा: कावलगाव (ता.पूर्णा) येथे गोवंशाची कत्तल करुन विक्री करण्यासाठी गोणीमध्ये मांसाचे तुकडे व एक कातडी भरुन नेत असलेल्या एका खाटकाला चुडावा पोलिसांनी अटक केली. ही घटना शुक्रवारी (दि. २४) रात्री घडली. पोलिसांनी घटनास्थळावरून ५ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणी खाटीक गौस यासीन कुरेशी (वय २८) याच्याविरूद्ध गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, कावलगाव येथे मागील काही दिवसांपासून गोवंश जनावरांची कत्तल होत असल्याची गुप्त माहिती चुडावा पोलिसांना मिळाली होती. दरम्यान, शुक्रवारी कावलगाव येथे गोवंशाची हत्या करुन त्याचे मांस २०० रु पये प्रति किलो प्रमाणे विक्रीसाठी नेताना कुरेशी याला ताब्यात घेतले. त्याच्याकडून २७.९७४ किलो मांस जप्त करण्यात आले.
ही कारवाई सपोनि नरसिंग पोमनाळकर यांच्या मार्गदर्शनात बिट जमादार प्रभाकर कच्छवे, शिंदे, मिटके, राठोड यांनी केली. पुढील तपास पोउनि पी. जाधव करीत आहेत.