

Construction of modern pedestrian bridge at Kinwat railway station in final stage
किनवट, पुढारी वृत्तसेवा :
किनवट रेल्वे स्थानकावर प्रवाशांची सुरक्षितता व सुविधा वाढविण्यासाठी प्रस्तावित १२ मीटर रुंद नवीन पादचारी पूल उभारणीच्या कामात एक महत्त्वपूर्ण टप्पा नुकताच पूर्ण करण्यात आला. प्रत्येकी २९.८० मीटर लांबीच्या एकूण ११ लोखंडी बीम (गर्डर्स) यशस्वीरीत्या बसविण्यात आल्या. केवळ ३ तासांच्या तांत्रिक वीज व वाहतूक बंदीच्या कालावधीत हे काम पार पाडण्यात आले.
या संदर्भात उल्लेखनीय बाब म्हणजे, केंद्र शासनाच्या 'अमृत भारत स्थानक योजना' अंतर्गत किनवट रेल्-वेस्थानकाचा समावेश करण्यात आला असून, या योजनेद्वारे देशभरातील रेल्वेस्थानकांचे आधुनिकीकरण केले जात आहे. या योजनेंतर्गत महाराष्ट्रातील १३२ स्थानकांचा तर नांदेड विभागातील एकूण १३ स्थानकांचा विकास केल्या जात आहे.