बाई हुशार : शाळेत गैरहजर पण मस्टरवर हजर

माखणी शाळेतील धक्कादायक प्रकार उघडकीस
complaint against teacher in makhani
माखणी येथे शिक्षिकेविरोधात गटशिक्षणाधिकाऱ्यांकडे तक्रार दाखल केली आहे. File Photo

ताडकळस, पुढारी वृत्तसेवा: एका शिक्षिकेने शाळेत गैरहजर राहूनही मस्टरवर सही करून हजर असल्याचे दाखवून प्रशासनाच्या डोळ्यात धूळफेक केली. हा प्रकार माखणी (ता. पूर्णा) येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत समोर आला आहे. याबाबत पालकांतून संताप व्यक्त केला जात आहे. या प्रकरणी एका शिक्षिकेविरोधात गटशिक्षण अधिकारी यांच्याकडे तक्रार दाखल केली आहे.

complaint against teacher in makhani
परभणी -ताडकळस ते महातपुरी शिवरस्ता खुला करण्यासाठी गेलेल्या शेतकऱ्यांवर दगडफेक

सरपंचाची गटशिक्षणाधिकारी यांच्याकडे तक्रार

माखणी येथील प्राथमिक शाळेतील सहशिक्षिका अश्विनी शहाणे या शाळेत गैरहजर असताना देखील त्यांनी शाळेच्या हजेरी पटावर स्वाक्षरी करून हजर असल्याचे दाखविले आहे. या प्रकारानंतर पालक वर्गांतून संताप व्यक्त केला जात आहे. तर या गंभीर प्रकाराची गावात उलटसुलट चर्चा सुरू झाली आहे. या प्रकरणी गावाचे सरपंच गोविंद हरीभाऊ आवरगड यांनी पूर्णा पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी बालाजी कापसीकर यांच्याकडे लेखी तक्रार दाखल केली आहे.

complaint against teacher in makhani
परभणी हळहळली : शिक्षणाचा खर्च झेपत नाही म्हणून गुणवंत विद्यार्थिनीने संपवले जीवन

तक्रारीत म्हटले आहे की, सहशिक्षिका अश्विनी शहाणे यांनी शाळेत गैरहजर असताना देखील शाळेच्या हजेरी पटावर स्वाक्षरी करून हजर असल्याचे दाखविले आहे. यामुळे मुलांचे शैक्षणिक नुकसान झाले आहे. या प्रकाराची गटशिक्षणाधिकारी यांनी चौकशी करून योग्य ती कारवाई करावी, अशी मागणी केली आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news