

जिंतुर : बौद्धगया येथील बौद्धगया महाबोधि महाविहार ब्राह्मनांच्या ताब्यातुन मुक्त करुन बौद्धांच्या ताब्यात द्यावे म्हणून आज (दि. ११) मार्च २०२५ रोजी भारतातील व संपूर्ण विश्वातील भिक्खु संघ व भिक्खुणी संघ व सर्व राज्यातील बौद्ध अनुयायी महाबोधि महाविहार बुद्धगया येथे उपोषणाला बसलेले आहेत.
महाबोधी महाविहार ब्राह्मनाच्या ताब्यातुन मुक्त करण्यासाठी हे आंदोलन सशक्त करण्यासाठी म्हणून जिंतुर तालुक्यातील बौद्ध भिक्खू भारतीय बौद्ध महासभा शाखा जिंतुर, आंबेडकरी चळवळीतील सर्व संघटना यांच्या वतीने तहसील कार्यालय जिंतुर समोर एक दिवसीय भव्य धरणे आंदोलन करण्यात आले. जिंतुर तालुक्यातील बौद्ध भिक्खू व आंबेडकरी चळवळीतील सर्व आंबेडकरी संघटना यांनी प्रशांत राखे तहसीलदार जिंतुर यांच्या मार्फत राष्टृपती द्रौपदी मुर्मू व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना निवेदन दिले. निवेदनातील प्रमुख मागण्या बी.टी.एम.सी.ॲक्ट पुर्णपणे रद्द करावा व महाबोधि महाविहार बौद्धांच्या ताब्यात द्यावे या आहेत.
यावेळी भिक्खु संघरत्न, भिक्खु महानंद,भिक्खु आर्याजी धम्ममाता अॅड. रमेश भडगळ, विकास आण्णा मोरे ,राजेन्द्र घनसावंत, महेंद्र बनसोडे, आनंद राव वाकळे, मोहन घनसावंत , सतिश वाकळे, शरद चव्हाण , कैलास खिल्लारे , सुनिता पाटील , आशाताई वाकळे ,आशा खिल्लारे आदी बौद्ध समाज बांधव सहभागी झाले होते.