

ताडकळस : ताडकळसहून पुर्णेकडे जाणाऱ्या राज्य महामार्गावर मंगळवारी सायंकाळी रस्ता ओलांडताना वाहनाने धडक दिल्याने काळवीट जखमी झाले. पाय फॅक्चर झाल्याने काळवीटाला चालता येत नव्हते. आजुबाजुला आसलेल्या नागरिकांनी काळवीटाला पाणी पाजले आणि पशू डॉ. माणिक हजारे यांना माहिती दिली. डॉ. हजारे यांनी जखमी काळवीटावर प्राथमिक उपचार केले. ताडकळस ग्रामपंचायतचे माजी उपसरपंच शेख शेहजाद, ग्रामपंचायत सदस्य बबलू माने, शेख यांनी याबाबतची माहिती परभणी येथील वनविभागाच्या अधिकाऱ्यांना दिली. रात्री उशीरा वन विभागाचे सुरेश सावंत, वन मजुर लक्ष्मण कानु राठोड काळवीटाला गाडीतून घेवून गेले.