भाजप पूर्णा तालुकाध्यक्षपदी संजय मोहिते, शहर मंडळपदी राज ठाकर यांची निवड

BJP Purna | पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांच्याकडून अभिनंदन
 BJP Purna
भाजप पूर्णा तालुकाध्यक्षपदी संजय मोहिते यांची निवड करण्यात आली. Pudhari Photo
Published on
Updated on

पूर्णा , पुढारी वृत्तसेवा: भारतीय जनता पार्टीच्या पूर्णा ग्रामीण तालुकाध्यक्षपदी संजय मोहिते तर शहर मंडळ अध्यक्षपदी राज ठाकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. भाजप ग्रामीण जिल्हाध्यक्ष संतोष मुरकुटे, डॉ सुभाष कदम, रामकिशन रौंदळे यांच्या नेतृत्वाखाली ही निवड करण्यात आली.

संजय मोहिते व राज ठाकर भाजप नेते संतोष मुरकुटे यांच्या मार्गदर्शनात भाजपचे काम करत आहेत. पालकमंत्री मेघना बोर्डीकर, माजी आमदार रामप्रसाद बोर्डीकर, संतोष मुरकुटे, डॉ केदार खटींग, डॉ सुभाष कदम, रामकिशन रौंदळे, लक्ष्मीकांत कदम, हनुमान अग्रवाल, डॉ. ठाकूर, लिंबाजी भोसले, आनंता पारवे, बळीराम कदम, बालाजी कदम, प्रशांत कापसे, राम चापके, नरहरी ढोणे, विजय कराड, विनय कराड, संजय अंबोरे, अनंतराव बनसोडे, सुनील डुब्बेवार, चंद्रकांत टाकळकर, भारत एकलारे यांनी अभिनंदन केले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news