

Manwat Shiv Sena Group Leader
मानवत : मानवत नगरपालिका निवडणुकीत शिवसेनेचे 4 सदस्य निवडून आले आहेत. नगरपालिकेच्या शिवसेना पक्षाच्या गटनेतेपदी प्रभाग क्रमांक 5 चे नगरसेवक अॅड. विक्रमसिंह दहे यांची निवड करण्यात आली आहे.
नुकत्याच झालेल्या नगरपालिका निवडणुकीत शिवसेनेचे 4 सदस्य निवडून आले असून यामध्ये प्रभाग क्रमांक 3 अ मधून विभा भदर्गे, 5 अ मधून अॅड. विक्रमसिंह दहे, 8 अ मधून शेख जवेरिया बेगम अहमद तर 8 ब मधून बागवान मोहम्मद बिलाल यांचा समावेश आहे.
दहे हे अटीतटीच्या झालेल्या लढतीत पहिल्यांदाच निवडून आले असून गटनेतेपदी निवड झाल्याबद्दल त्यांचे अभिनंदन होत आहे. भाजपच्या गटनेतेपदी भाजपच्या तिकिटावर एकमेव निवडून आलेले नगरसेवक शैलेंद्र कत्रूवार यांची नियुक्ती करण्यात आली आहे. शिवसेना व भाजप युतीच्या नगरसेवकांनी जिल्हाधिकारी संजयसिंग चौहान यांची सदिच्छा भेट घेतली.