विहिरीचे खोदकाम मजुरांकडूनच करा; या मागणीसाठी दोघांचा विष पिऊन जीवन संपवण्याचा प्रयत्न

मानवत
मानवत

मानवत, पुढारी वृत्तसेवा : शासकीय योजनेमार्फत खोदल्या जाणाऱ्या विहिरीचे खोदकाम जेसीबीद्वारे न करता मजुरांमार्फतच करावे, या मागणीसाठी मानवत तालुक्यातील मानोली येथील दोन मजुरांनी गुरुवारी दुपारच्या सुमारास पंचायत समितीच्या आवारात विष पिऊन जिवन संपवल्यांची घटना घडल्याने खळबळ उडाली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मानोली येथील ग्रामस्थ संतोष शिंदे आणि सुरेश मांडे यांनी पंचायत समिती मध्ये, काही दिवसांपूर्वी शासकीय योजनेमार्फत खोदल्या जाणाऱ्या विहिरीचे खोदकाम जेसीबी मशीनद्वारे न करता मजुरांमार्फत करावे असे निवेदन दिले होते. जेणेकरून यामध्ये मजुरांचे नुकसान होणार नाही आणि त्याचा फटका मजूर लोकांना बसणार नाही असे नमूद केले होते. या निवेदनाबद्दल त्यांनी वारंवार पंचायत समितीमध्ये खेटे मारून देखील कोणत्याही प्रकारची कार्यवाही होत नसल्यामुळे त्यांनी (दि.2) रोजी सकाळी जीवन संपवण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर लगेच पंचायत समिती मार्फत अधिकाऱ्यांनी रुग्णवाहिका बोलावून त्यांना परभणीच्या शासकिय रुग्णालयात पाठवण्यात आले, असून सध्या त्यांच्यावर उपचार सुरू आहेत .

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news