पूर्णेत डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या पार्श्वभुमीवर पोलीसांचा रुटमार्च | पुढारी

पूर्णेत डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या पार्श्वभुमीवर पोलीसांचा रुटमार्च

पूर्णा, पुढारी वृत्तसेवा : आज (१४ एप्रिल २०२४) डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी केली जात आहे. पूर्णा शहरात कुठलाही अनूचित प्रकार घडू नये यासाठी शनिवारी (दि. १३) सायंकाळी ६:२० वाजता मिरवणूक मार्गावरुन पोलीस पथकाने रुट मार्च काढला.

उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ समाधान पाटील,पोनि विलास गोबाडे,सपोनि दर्शन शिंदे,नांदगावकर,रेखा शहारे,पोउनि शिवप्रसाद क-हाळे, सुरजित सिंघ,रामकिशन चव्हाण सह ८ पोलिस अधिकारी,१४ अंमलदार, राज्य राखीव दलाचे २ अधिकारी, ४५ अंमलदार, २५ होमगार्ड हजर होते यांचा या रुटमार्च पथकात समावेश होता. तसेच यानंतर उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ समाधान पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोनि विलास गोबाडे यांनी ग्राऊंडवर उपस्थित पोलिस कर्मचा-यांचा बेकायदेशिर जमाव नियंत्रीत करण्यासाठी ची दंगा काबू योजना कवायत घेण्यात आली.या आधि देखील रमजान ईदच्या अनूषंगाने पोलीसांचा रुटमार्च हा अक्षरशः पावसात भिजत काढण्यात आला होता.

Back to top button