परभणी: निरवाडी येथे अॅटोत बसण्याच्या कारणावरून तरुणाचा खून | पुढारी

परभणी: निरवाडी येथे अॅटोत बसण्याच्या कारणावरून तरुणाचा खून

चारठाणा, पुढारी वृत्तसेवा : अॅटोत बसण्याच्या कारणावरून झालेल्या वादातून हत्याराने वार करून तरुणाचा खून करण्यात आला. ही घटना मंगळवारी (दि.२७) निरवाडी येथील अॅटो पॉईंट झेंडयाजवळ घडली. गजानन यादव गिते (वय २६) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे.

गजानन गिते याच्यावर चारठाणा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार करून पुढील उपचारासाठी परभणी येथील खासगी रुग्णालयात हलविण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. या प्रकरणी एकनाथ गिते याच्या फिर्यादीवरून संशयित आरोपी अमोल काळे, गणेश काळे, मथुराबाई काळे या तिघांविरुद्ध चारठाणा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

घटनास्थळी पोलीस उपविभागीय अधिकारी पाडुरंग गोफने, साहयक पोलीस निरीक्षक प्रभाकर कापुरे, पोलीस उपनिरीक्षक साने दत्ता भदर्गे, वसंत वाघमारे, संजय मुंढे, पवन राऊत, शेख जिलानी दाखल झाले होते.

हेही वाचा 

Back to top button