परभणी : पुर्णेत रेल्वे मालगाडीचे डिझेल इंजिन रुळावरुन घसरले, मोठा अनर्थ टळला | पुढारी

परभणी : पुर्णेत रेल्वे मालगाडीचे डिझेल इंजिन रुळावरुन घसरले, मोठा अनर्थ टळला

पूर्णा; पुढारी वृत्तसेवा : रेल्वे मालगाडीचे डिझेल इंजिन रुळावरुन घसरले असुन मोठा अनर्थ टळला असल्याची घटना पुर्णा ते अकोला रेल्वे मार्गावर आज (दि.२६) सायंकाळी सहा वाजताच्या सुमारास घडली.

सांयकाळी सहा वाजताच्या सुमारास पूर्णा रेल्वे स्टेशनवरुन मालगाडी सोडण्यात आली. ही मालगाडी स्टेशनवरुन सुटल्यानंतर काही क्षणातच मालगाडी डिझेल इंजिनचे दोन्ही बाजुचे चाके रुळावरुन घसरले त्यामुळे मोठा अनर्थ टळला असला तरी नांदेडकडे व परभणीकडे जाणाऱ्या गाड्या विलंबाने धावल्या राञी उशीरा पर्यत रेल्वेचे आपतकालीन पथक वाहतुक सुरळीत करण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करीत होते.

Back to top button